महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या वतीने गडचिरोलीत जगनाडे महाराज जयंती

इंदिरा गांधी चौकात प्रतिमेसमोर अभिवादन

गडचिरोली : संत तुकोबारायांची गाथा पुन्हा लिहून तेली समाजावर अनंत उपकार करणारे थोर संत संताजी जगनाडे महाराज यांची ४२४ वी जयंती शुक्रवारी स्थानिक इंदिरा गांधी चौकात साजरी करण्यात आली. यावेळी जगनाडे महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

या कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पिपरे व प्रभाकर वासेकर, विदर्भ तेली महासंघाचे अध्यक्ष सुरेश भांडेकर, संताजी सोशल मीडियाचे अध्यक्ष प्रा.देवानंद कांबळे, डी.डी. सोनटक्के, राजेश ईटनकर, संतोष खोब्रागडे, विष्णू कांबळे, सुधाकर दूधबावरे, गोपीनाथ चांदेकर, चंद्रकिशोर किरमे, आनंदराव मदनकर, सुधाकर लाकडे, विठ्ठलराव कोठारे, राहुल भांडेकर, प्रफुल्ल आंबोरकर, आकाश आंबोरकर, अक्षय भांडेकर तसेच तेली समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.