महायुतीमधील तिकीट वाटपाच्या स्थितीवर ना.वडेट्टीवारांची सेना-राकाँवर बोचरी टिका

काय म्हणाले विरोधीपक्ष नेता, ऐका

गडचिरोली : महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसला भाजपकडून तिकीट वाटपात अपेक्षित जागा मिळत नसल्यामुळे त्यांची अवस्था अतिशय वाईट झाली आहे. सांगताही येत नाही आणि काही करताही येत नाही, अशी त्यांची केविलवाणी स्थिती भाजपने केली आहे. त्यांच्यापेक्षा रस्त्यावरचे भिकारी तरी बरे, अशा शब्दात विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी दोन्ही पक्षांवर बोचरी टिका केली. भविष्यात त्यांची स्थिती भाजपच्या गुलामासारखी होईल, असेही ते म्हणाले.

गडचिरोलीत बुधवारी संध्याकाळी प्रसार माध्यमांसोबत ते बोलत होते. यावेळी आ.सहेषराव कोरोटे, आ.अभिजित वंजारी, माजी खा.मारोतराव कोवासे, उमेदवार डॅा.नामदेव किरसान यांच्यासह महाविकास आघाडीतील पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.