खासदारांच्या घरावर फुलले कमळ, केंद्रीय योजनांच्या पत्रकांचेही वाटप

'फिर एक बार...' म्हणत रंगल्या भिंती

गडचिरोली : ‘फिर एक बार मोदी सरकार’ असा संकल्प करत भाजपकडून राबविल्या जात असलेल्या भिंतीलेखन अभियानात खा.अशोक नेते यांनी त्यांच्या घराच्या दर्शनी भागावरही कमळाचे फूल रेखाटले. विकसित भारत संकल्प यात्रेच्या व्हिडिओ व्हॅन अभियानात सहभागी होऊन त्यांनी गडचिरोली शहरातील शाहूनगरातही काही घरांवर भिंतीलेखन केले. यावेळी त्यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांसोबत केंद्र शासनाच्या विविध योजनांच्या पत्रकांचे वितरणसुद्धा केले

याप्रसंगी प्रामुख्याने लोकसभा विस्तारक बाबुराव कोहळे, गडचिरोली विधानसभा विस्तारक दामोदर अरिगेला, शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर पेटकर, ओबीसी नेते तथा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अविनाश पाल, जिल्हा सचिव अनिल कुनघाडकर, कमलाकर सिद्धमशेटीवार, देवराव कोठेवार, विनोद देवोजवार, केशव निंबोड, दत्तू माकोडे, अविनाश विश्रोजवार, विलास नैताम, दतु सुत्रपवार, तुळशीदास भुरसे, गणेश नेते, प्रशांत अल्लमपटलावार तसेच भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.