आसरअल्लीत महायुतीची जाहीर सभा, ना.आत्राम, खा.नेते यांची उपस्थिती

अहेरी विधानसभेत मतांची आघाडी देणार

सिरोंचा : लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सिरोंचा तालुक्यातील आसरअल्ली येथे बुधवारी (दि.3) जाहीर सभेचे आयोजन केले होते. या सभेला राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम आणि उमेदवार खा.अशोक नेते यांनी मार्गदर्शन केले. महायुतीचे उमेदवार खा.नेते यांना अहेरी विधानसभा क्षेत्रात मतांची आघाडी मिळेल, असे सांगत त्यांचा विजय निश्चित आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या सभेला प्रामुख्याने मंचावर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री आत्राम, लोकसभा विस्तारक बाबुराव कोहळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा जिल्हाध्यक्ष लिलाधर भरडकर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविंद्र ओल्लालवार, जिल्हा उपाध्यक्ष प्रणय खुणे, जेष्ठ नेते सत्यनारायण मंचालवार, जिल्हा उपाध्यक्ष दामोदर अरिगेला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष मधुकर कोल्लुरी, भाजपचे तालुका अध्यक्ष शंकर नरहरी, रवी रालबंडीवार, गजानन कलक्षेपवार, श्रीकांत सुगरवार, भास्कर गुडीमेटला, सतीश गांजीवार, विश्वेश्वर कोंडा, सतीश भोगे, नागरेड़्डी गुडीमेटला, श्रीनिवास गोतुरी व भारतीय जनता पक्षाचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी तथा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मंत्री धर्मरावबाबा आत्राम म्हणाले, काँग्रेसचे उमेदवार हे बाहेरचे पार्सल उमेदवार आहेत. आपल्या क्षेत्रात त्यांचा कुठेही संबंध नाही. त्यामुळे त्यांचा पराभव निश्चित आहे. यावेळी ‘अब कि बार, चारसौ पार’ करत खा.नेते यांचा विजय निश्चितच होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या सभेत खा.अशोक नेते यांनी त्यांचा कार्यकाळात झालेल्या कामांची माहिती दिली. दुर्गम भागातील रस्त्यांची कामे, राष्ट्रीय महामार्गाचे जाळे, अनेक वर्षांपासून रखडलेला रेल्वेचा प्रश्न मार्गी लावणे, सिंचन प्रकल्पांसाठी निधी, केंद्रीय विद्यालय, एकलव्य विद्यालय, मेडिकल कॉलेज, सुरजागड लोह प्रकल्प अशी अनेक कामे मंजूर करून घेण्यासाठी मी पुढाकार घेतला. पंतप्रधान मोदी यांच्या ऐतिहासिक निर्णयांनी जगातील देशही प्रभावित झाले आहेत. त्यामुळे भारताला विकसित बनविण्यासाठी, देशाच्या आणि गडचिरोलीच्या प्रगतीसाठी पुन्हा एकदा सेवा करण्याची संधी द्या, असे खासदार नेते याप्रसंगी म्हणाले.

यावेळी माजी जि.प अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांनीही आपले विचार व्यक्त करताना १७ एप्रिल या तारखेला श्रीराम नवमी आहे. श्रीरामाचा नारा देऊन दि.19 ला कमळालाच मतदान करून विजयी करा, असा संदेश त्यांनी दिला. यावेळी लोकसभा विस्तारक बाबुराव कोहळे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविंद्र ओल्लालवार, जिल्हा उपाध्यक्ष दामोदर अरिगेला यांनीसुद्धा सभेला मार्गदर्शन केले.