खासदार नेते यांच्यासह आमदार गजबे आरमोरीत झाले बाईकवर स्वार

रामनवमीच्या पर्वावर दिल्या शुभेच्छा

आरमोरी : येथे भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या वतीने बुधवारी दि.17 रोजी रामनवमीच्या पर्वावर भव्य बाईक रॅलीचे आयोजन केले होते. यावेळी खा.अशोक नेते आणि आ.कृष्णा गजबे यांनी दुचाकीवर स्वार होऊन स्वत: गाडी चालवत समस्त आरमोरीकरांना रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या. या रॅलीत आरमोरी शहरातील आणि ग्रामीण भागात कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

बाईक रॅलीला महायुतीचे उमेदवार तथा खासदार अशोक नेते यांनी हिरवी झंडी दाखविली. त्यानंतर ते स्वत: दुचाकी चालवत रॅलीत सहभागी झाले. तत्पूर्वी आरमोरीतील प्रचार कार्यालयात त्यांनी पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधत महायुतीच्या विजयासाठी कोणतीही कसर ठेवू नका असे आवाहन केले. माता दुर्गा मंदिराजवळील राम मंदिरात दर्शन घेऊन ही रॅली शहराच्या प्रमुख मार्गाने फिरली.

यावेळी ज्येष्ठ सहकार नेते प्रकाश सावकार पोरेड्डीवार, आ.कृष्णा गजबे, भाजपा तालुकाध्यक्ष पंकज खरवडे, आरमोरीचे माजी नगराध्यक्ष पवन नारनवरे, माजी आरोग्य सभापती भारत बावनथडे, जिल्हा सचिव नंदु पेठ्ठेवार, उपाध्यक्ष अरुण हरडे, नंदू नाकतोडे, विलास पारधी, सुशिल सावकार पोरेड्डीवार, आदिवासी तालुका अध्यक्ष खेमराज जांभुळे, मिनाक्षी गेडाम, ओबीसी आघाडीचे नेते अभिमन्यू राऊत अरसोडा, अक्षय हेमके, युगल समृतवार आदी पदाधिकारी उपस्थित होते.