Home राजकीय घडामोडी जिल्ह्यातील नेतेमंडळींनी घेतले ‘वर्षा’ बंगल्यावर गणरायाचे दर्शन

जिल्ह्यातील नेतेमंडळींनी घेतले ‘वर्षा’ बंगल्यावर गणरायाचे दर्शन

जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासाचे साकडे

गडचिरोली : मुख्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबई येथील ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी गुरूवारी (दि.24) माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी, चिमूरचे आमदार बंटी भांगडिया, गडचिरोलीचे नगरसेवक सागर निंबोरकर आदींनी भेट देऊन बंगल्यात विराजमान गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले.

यावेळी डॉ.उसेंडी आणि इतर नेत्यांनी बाप्पांची विधिवत पूजा-अर्चा करून गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी व जिल्ह्यातील जनतेच्या सुख, शांती व समृद्धीसाठी प्रार्थना केली. यावेळी गडचिरोलीवरून पंकज खोबे, महेश प्रेमलवार हेसुद्धा उपस्थित होते.