Home राजकीय घडामोडी आ.धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन

आ.धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन

आरोग्य केंद्राची होणार नवीन इमारत

सिरोंचा : अहेरी विधानसभा क्षेत्रांअंतर्गत सिरोंचा तालुक्यातील नरसिंहपल्ली येथे आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन तसेच मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्याहस्ते करण्यात आले.

आ.धर्मरावबाबा आत्राम यांच्या प्रयत्नातून कारसपल्ली ते सिरोंचापर्यंत मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून तीन किलोमीटरचा रस्ता मंजूर करण्यात आला. 29 एप्रिल रोजी सिरोंचा तालुक्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी सदर कामाचे भूमिपूजन केले.

यावेळी अहेरीचे माजी पंचायत समिती सदस्य हर्षवर्धनबाबा आत्राम, सामाजिक कार्यकर्ते बबलू हकीम, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अहेरी विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येरावार, सिरोंचा तालुका अध्यक्ष मधुकर कोल्लूरी, नगरसेवक सतीश राचर्लावार, स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच गावकरी उपस्थित होते.

मागील काही वर्षांपासून नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. स्थानिकांनी रस्त्याचे बांधकाम करण्याची मागणी धर्मरावबाबांकडे केली होती. त्यांची अडचण लक्षात घेऊन आ.आत्राम यांनी त्यासाठी निधी खेचून आणला. अखेर सदर रस्त्याचे भूमिपूजन झाले असून लवकरच कामाला सुरुवात होणार आहे. रस्त्याचे बांधकाम पूर्ण झाल्यावर परिसरातील नागरिकांची मोठी अडचण दूर होणार असल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.