Home राजकीय घडामोडी जिल्हावासियांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी हनुमान चालिसा पठण

जिल्हावासियांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी हनुमान चालिसा पठण

सेमाना मंदिरात काँग्रेसचे होम हवन

गडचिरोली : जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह अनेक क्षेत्रातील विविध समस्या सुटाव्या यासाठी काँग्रेसच्या वतीने मंगळवारी सेमाना येथील हनुमान मंदिरात हनुमान चालिसा पठण आणि होम हवन करण्यात आला. सरकारचे आणि मुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्ह्यातील समस्या सोडविण्याची बुद्धी देण्यासाठी काँग्रेसकडून हनुमानाला साकडे घालण्यात आले.

जिल्ह्यात बेशिस्त वाहतुकीमुळे दिवसागणिक अपघातांचे प्रमाण वाढत आहे. जिल्ह्यातील सुपीक जमिनी अधिग्रहित करून शेतकऱ्यांना भूमिहीन केले जात आहे. वन्यप्राण्यांचा त्रास, रिक्त पदांमुळे आरोग्य व्यवस्थेचे हाल, ग्रामीण भागात केले जात असलेले लोडशेडींग, जिल्ह्यातील रखडलेले सिंचन प्रकल्प अशा अनेक समस्या कायम असताना पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील जनतेला पोरके केल्याचा आरोप काँग्रेसने केला. जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी देवाभाऊंनी लक्ष घालावे, अशी प्रार्थना जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या मार्गदर्शनात हनुमान चालीसा पठण करून करण्यात आली.

यावेळी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव अॅड.विश्वजित कोवासे, माजी जि.प. उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, शहर अध्यक्ष सतीश विधाते, जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव सालोटकर, परसराम टिकले, कुरखेडा तालुकाध्यक्ष जीवन नाट, गडचिरोली तालुकाध्यक्ष वसंत राऊत, आरमोरी तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, धानोरा तालुकाध्यक्ष प्रशांत कोराम, कोरची तालुकाध्यक्ष मनोज अग्रवाल, वडसा तालुकाध्यक्ष राजेंद्र बुल्ले, चामोर्शी तालुकाध्यक्ष प्रमोद भगत, हरबाजी मोरे, रजनीकांत मोटघरे, रुपेश टिकले, सुमेध तुरे, दिवाकर निसार, नंदू वाईलकर, अनिल कोठारे, विनोद लेंगुरे, नितीन राऊत, दिलीप घोडाम, महादेव भोयर, उत्तम ठाकरे, सुधीर बांबोळे, अब्दुल पंजवानी, राजेश ठाकूर, श्रीनिवास ताडपल्लीवार, संजय चन्ने, धीवरू मेश्राम, हेमंत मोहितकर, स्वप्निल बेहेरे, विजय लाड, निकेश कामिडवार, चोखाजी बांबोळे, नदीम नाथानी, योगेंद्र झंजाड, दुधराम भोयर, प्रफुल बारसागडे, लक्ष्मण मेश्राम, कविता भगत, कल्पना नंदेश्वर, कविता उराडे, पौर्णिमा भडके, रिता गोवर्धन, वृंदा गजबे, शेवंता हलामी, दीपिका उसेंडी, अनिता डोईजड, आरती कंगाले, शालिनी पेंदाम, पल्लवी बांबोडे, पुष्पा चौधरी, सुमन उंदीरवाडे यांच्यासह इतर कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.