Home राजकीय घडामोडी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत 13 ला मेळावा

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत 13 ला मेळावा

तयारीसाठी देसाईगंजमध्ये बैठक

देसाईगंज येथे बैठकीला उपस्थित भाजपचे पदाधिकारी

देसाईगंज : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत येत्या 13 ऑगस्ट रोजी देसाईगंज येथे पक्षाचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर रविवारी प्रमुख पदाधिकाऱ्यांची नियोजन बैठक पार पडली.

माजी जिल्हाध्यक्ष किशन नागदेवे यांच्या निवासस्थानी आयोजित या बैठकीला माजी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री (एसटी मोर्चा) डॉ.अशोक नेते, जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, माजी आमदार कृष्णा गजबे, मा.आ.डॉ.नामदेव उसेंडी, कि.मो.प्र. सचिव रमेश भुरसे, जिल्हा महामंत्री सदानंद कुथे, आरमोरीचे नगराध्यक्ष रुपेश पुणेकर, देसाईगंज तालुका अध्यक्ष सुनील पारधी, कुरखेडा तालुका अध्यक्ष चांगदेव फाये आणि आरमोरी तालुका अध्यक्ष पंकज खरवडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी कार्यक्रमाच्या व्यवस्थापनाचा आढावा घेण्यात आला. तसेच देसाईगंज नगर परिषदेतील सभागृह व तेथील बैठक व्यवस्थेची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. प्रदेशाध्यक्षांचा हा दौरा आणि पदाधिकारी मेळावा अभूतपूर्व रीतीने यशस्वी करण्याचा संकल्प यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.