Home दैनंदिन बातम्या जिल्हाभरात उत्साहाने साजरा झाला जागतिक आदिवासी दिन

जिल्हाभरात उत्साहाने साजरा झाला जागतिक आदिवासी दिन

अनेक ठिकाणी लक्षवेधक रॅली

गडचिरोली : जागतिक आदिवासी दिनानिमित्त रविवारी (दि.9) गडचिरोली शहरासह जिल्हाभरात मोठ्या उत्साहाने मिरवणुकांसह विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. मिरवणुकांमध्ये नृत्य पथकासह महिला आणि युवा वर्गाने पिवळे वस्र धारण करत उत्साहाने सहभागी होऊन पारंपरिक वाद्य आणि गाण्यांवर ठेका धरल्याचे चित्र सर्वत्र पहायला मिळाले. या दिवसाच्या निमित्ताने आदिवासी संस्कृतीची झलक सर्वत्र पहायला मिळाली.

गडचिरोली शहराच्या विविध भागातून निघालेल्या मिरवणुका वाजत-गाजत दुपारी इंदिरा गांधी चौकातून आरमोरी रोडवरील संस्कृती सांस्कृतिक भवनात दाखल झाल्या. त्या ठिकाणी माजी नगरसेवक गुलाब मडावी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. भवनात आदिवासी समाजातील क्रांतीकारक आणि पुरूषांच्या प्रतिमांना माल्यार्पण आणि दीप प्रज्वलन करून आ.डॅा.मिलिंद नरोटे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजकल्याणचे सहायक आयुक्त डॅा.सचिन मडावी होते.

यावेळी मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार डॅा.नामदेव उसेंडी, सहायक जिल्हाधिकारी डॅा.अजय डोके, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अॅड.विश्वजित कोवासे, शिवसेनेचे (उबाठा) जिल्हाध्यक्ष पवन गेडाम, आदिवासी एम्प्लॅाईज फेडरेशनचे माधवराव गावळ, सावित्री-रमाई विचार मंचच्या अध्यक्ष डॅा.अभिलाषा गावतुरे, ज्येष्ठ साहित्यिक ब्रह्मानंद मडावी, कुसूम अलाम, न.प.सभापती हर्षल गेडाम, नगरसेविका वर्षा शेडमाके, डॅा.माधुरी किलनाके, गटशिक्षणाधिकारी हेमलता परसा, प्रा.डॅा.प्रिया गेडाम, माधुरी मडावी, भरत येरमे असे विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

यावेळी विशेष कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा आणि इतर नागरिकांचा सत्कार करण्यात आला.

गोकुळनगरात आदिवासी दिवस उत्साहात

गोकुळनगर येथील बिरसा मुंडा चौकात जागतिक आदिवासी दिवस उत्साहात व विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष अमोल कुळमेथे होते. कार्यक्रमाची सुरुवात कुळमेथे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून झाली. समितीचे अध्यक्ष अमोल कुळमेथे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आदिवासी समाजाचा गौरवशाली इतिहास, संस्कृती, परंपरा, हक्क व सामाजिक एकतेचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले.

जागतिक आदिवासी दिवसाच्या निमित्ताने आदिवासी समाजाच्या विकासासाठी एकजुटीने कार्य करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. कार्यक्रमास आदिवासी एकता युवा समितीचे सचिव प्रदीप कुळसंगे, संघटक संजय मेश्राम, कोषाध्यक्ष मंगेश नैताम, सहसचिव गिरीश उईके, आकाश कोडापे, देवाजी कोडापे, प्रफुल कोडापे,
प्रशांत वरभे, वामनराव जुनघरे, अजय कुकडकर, वासुदेव कोडापे, सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा बारसागडे, शेषराव मडावी, शेखर मडावी, हरिदास अलाम, वामन येरमे, अनिल गणवीर, निलेश कोडापे, अंकुश उईके, नारायण मडावी, वासुदेव खंडाते, नागोराव उईके, सुनील बावणे, समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच गोकुळनगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.