Home दैनंदिन बातम्या अमिर्झा, खरपुंडीत भागवत सप्ताह, भक्तीसागरात न्हात आहेत भाविक

अमिर्झा, खरपुंडीत भागवत सप्ताह, भक्तीसागरात न्हात आहेत भाविक

मा.खा.डॅा.नेते यांची उपस्थिती

भाविकांशी संवाद साधताना मा.खा.डॅा.अशोक नेते

​गडचिरोली : गुढीपाडवा ते रामनवमीपर्यंत चालणाऱ्या श्रीमद भागत सप्ताहात गडचिरोली तालुक्यातील अमिर्झा व खरपुंडी ही गावे न्हाऊन निघत आहेत. श्रीराम जन्मोत्सव पर्वकाळानिमित्त अमिर्झातील संत ज्ञानेश्वर माऊलींच्या ‘श्रीमद् भागवत सप्ताहा’ला, तसेच खरपुंडी येथील भागवताला माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॅा.अशोक नेते यांनी भेट देऊन दर्शन घेत भाविकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विधीवत पूजाअर्चा व आरतीही केली.

​आध्यात्मिक संस्कारांमुळेच मानवी जीवन समृद्ध- डॉ.नेते
​यावेळी मार्गदर्शन करताना मा.खा.डॉ.अशोक नेते म्हणाले, “भागवत सप्ताहासारखे धार्मिक कार्यक्रम केवळ परंपरेचा भाग नसून ते समाजाला दिशा देणारे संस्कार केंद्र आहेत. अध्यात्मामुळे मानवी जीवनात शांतता आणि संयम येतो, आचार-विचार बदलतात. ग्रामीण भागातील अशा उपक्रमांमुळे तरुणांमध्ये नैतिक मूल्यांची जोपासना होते, जी आजच्या काळाची मोठी गरज आहे,” असे मार्गदर्शन त्यांनी केले.

अमिर्झा येथील हनुमान मंदिर पटागंणावर दि.19 ते 27 मार्च पर्यंत आयोजित भागवत सप्ताहामुळे, तसेच खरपुंडी येथील हनुमान मंदिराच्या प्रांगणात श्रीराम जन्मोत्सवानिमित्त आयोजित ‘श्रीमद् भागवत सप्ताहा’मुळे परिसरात भक्तीरसात न्हाऊन निघाला आहे.

या भेटीप्रसंगी मा.खा.डॅा.नेते यांच्यासोबत जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, सामाजिक नेते देवीदास नागरे, माजी पं.स. सदस्य प्रमोद धारणे, संजय कोतपल्लीवार, रमेश नैताम, एकनाथ टिकले, चिचघरेजी व मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.