Home दैनंदिन बातम्या उदापूरमध्ये सापडला प्राचिन बौद्ध स्तुप, मध्य भारतात सर्वात मोठा

उदापूरमध्ये सापडला प्राचिन बौद्ध स्तुप, मध्य भारतात सर्वात मोठा

26 सप्टेंबरला कार्यक्रमाचे आयोजन

गडचिरोली : प्राचिन बौद्ध ऐतिहासिक स्थळ शोध मोहिमेअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्याच्या हद्दीतील ब्रम्हपुरीजवळ (आरमोरी रोड) उदापूर येथे प्राचीन भव्य स्तुप आढळला आहे. हा स्तुप सम्राट अशोकाच्या काळातील असून तो मध्य भारतातील सर्वात मोठा असण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याचे संवर्धन करून पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याची मागणी केली जात आहे.

येत्या शनिवार, दि.26 सप्टेंबरला भाद्रपद पौर्णिमेच्या पर्वावर उदापूरमध्ये उत्सव साजरा केला जाणार आहे. त्यासाठी समस्त बहुजन समाजाने स्तुपस्थळी दुपारी 1 वाजतापासून शुभ्र वस्त्र धारण करून समुहाने एकत्रित येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सदर कार्यक्रमास सत्य की खोजकार, सत्यशोधक नागमित्र धर्मेश पाटील (नागपूर) व त्यांची टिम, सोबत भन्ते ज्ञानज्योती (चिमुर) आणि इतर भन्तेगण उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील धम्म बांधवांनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ.गोपाल रायपुरे (चंद्रपूर), प्रा.मुनिश्वर बोरकर (गडचिरोली), सामाजिक कार्यकर्त्या सुशिला भगत (आलापल्ली), सामाजिक कार्यकर्त्या प्रज्ञा निमगडे (आरमोरी) यांनी केले आहे.