Home दैनंदिन बातम्या मा.खा.डॅा.नेते यांनी घेतली मोखाळा व केरोडातील शोकाकुल कुटुंबांची भेट

मा.खा.डॅा.नेते यांनी घेतली मोखाळा व केरोडातील शोकाकुल कुटुंबांची भेट

कोमलवार परिवाराला आर्थिक मदत

मा.खा.डॅा.अशोक नेते यांच्या वतीने आर्थिक मदत सुपूर्द करताना दिवाकर गेडाम

गडचिरोली : सावली तालुक्यातील मोखाळा व केरोडा या गावांमध्ये घडलेल्या दुर्दैवी घटनांच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.अशोक नेते यांनी दोन्ही ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन शोकाकुल कुटुंबियांचे सांत्वन केले.

मोखाळा येथील तालुका कार्यवाहक स्वयंसेवक पुंडलिक शेरकी यांच्या आईचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. दुसरीकडे, केरोडा येथील वैभव भगवान कोमलवार यांना सर्पदंश झाल्याने गडचिरोली जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या दोन्ही दुर्दैवी घटनांच्या पार्श्वभूमीवर माजी खासदार डॉ.अशोक नेते यांनी दोन्ही गावांना भेट दिली.

शेरकी आणि कोमलवार कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करत शोकसंवेदना व्यक्त केल्या. स्व.वैभव कोमलवार यांच्या अकाली निधनाने त्यांच्या कुटुंबावर कोसळलेल्या संकटाची दखल घेत डॉ.नेते यांनी कुटुंबियांना धीर दिला, तसेच त्यांना तातडीची आर्थिक मदत सुपूर्द करून सामाजिक बांधीलकी जपली.

या सांत्वन भेटीदरम्यान भाजप नेते अविनाश पाल, कृषी उत्पन्न बाजार समिती (सावली)चे माजी संचालक गुरूदेव भुरसे, आनंद शेरकी, दिलीप चलाख, सुभाष येरमलवार, प्रशांत ढोलणे, विश्वनाथ काटलाम, नक्टु चुनकलवार, भजभुजेजी आणि गुलाब परोते यांच्यासह मोखाळा व केरोडा येथील स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.