गडचिरोली : छत्रपती सेनेचे संस्थापक अध्यक्ष अरविंद कात्रटवार यांच्या पुढाकाराने आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अमिर्झा येथील ‘गुरूमठ’ या पावनस्थळी छत्रपती सैनिकांचा स्नेहमिलन सोहळा अतिशय उत्साहाच्या आणि आनंदाच्या वातावरणात संपन्न झाला. (खाली वाचा)


यावेळी छत्रपती सेनेचे जिल्हा प्रमुख यादव लोहंबरे, जिल्हा संघटक विनोद चापले, उपजिल्हा प्रमुख गोपाल मोंगरकर, जिल्हा समन्वयक दीपक लाडे, जिल्हा सचिव विलास मुळे, तालुका संघटक प्रशांत ठाकूर, विधानसभा संघटक अमित चौधरी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. (खाली वाचा)

छत्रपती सेनेचा जन्म संघर्षातून झाला आहे. कितीही संकटे आली तरी कट्टर छत्रपती सैनिक हा घाबरणारा नसून तो लढणारा आहे. संकटाचा सामना संघर्ष व एकजुटीने करा. छत्रपती सेनेची ताकद गावागावत बळकट करा, असे आवाहन यावेळी छत्रपती सेनेचे संस्थापक अध्यक्ष अरविंद कात्रटवार यांनी केले. (खाली वाचा)

दीपावलीच्या पावन पर्वावर अरविंद कात्रटवार यांच्या पुढाकाराने गडचिरोली तालुक्यातील मौशीखांब-मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रातील छत्रपती सैनिकांच्या या स्नेहमिलन सोहळ्याला मोठ्या संख्येने छत्रपती सैनिक अमिर्झा येथील ‘गुरूमठ’ या पावनस्थळी जमले होते. (खाली वाचा)

यावेळी छत्रपती सैनिकांना संबोधित करतांना कात्रटवार म्हणाले, यावर्षी दुष्काळामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. नुकसानभरपाईसुद्धा देण्यात आलेली नाही. शेतकऱ्यांच्या धानाला योग्य हमीभाव दिला जात नाही. शेतकरी अनेक संकटांचा सामना करीत आहेत. परंतू संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना स्थैर्य देण्याचे काम राज्यातील सरकार करीत नसल्याचे अरविंद कात्रटवार म्हणाले. (खाली वाचा)

आता आपल्याला न डगमगता नव्या दमाने वाटचाल करायची आहे. तुमच्या समस्या, अडीअडचणी दूर करण्यासाठी आपण सामूहिकपणे प्रयत्न करू, असे आवाहन त्यांनी केले. (खाली वाचा)

या उत्साहपूर्ण कार्यक्रमाने त्या भागातील नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्याचे दिसून आले. आम्ही तुमच्या नेतृत्वातच पुढील वाटचाल करू, अशी भावना यावेळी नागरिकांनी व्यक्त केली. (खाली वाचा)

यावेळी सुरेश कोलते, दिलीप वेलादी, देवेंद्र मुळे, दीपक लाडे, विकास उंदीरवाडे, गोपाल मोगरकर, पुरुषोत्तम सुर्यवंशी, महेश लाजुरकर, विनोद खेवले, लोमेश कुमरे, निकेश कोलते, देवेंद्र कोटगले, धनंजय चापले, आकाश लडके, विकास उंदीरवाडे, जयकुमार खेडेकर, अनिल राऊत, नरेश कावळे, तोकेश सहारे, सुरज कलसार, पुरुषोत्तम उंदीरवाडे, विलास भैसारे, छत्रपती भैसारे, कुसन ढवळे, अंबादास मुन्घाटे, आकाश बानबले, लोकेश नैताम, भगवान चनेकार, राकेश मुनघाटे, अमोल नन्नावरे, प्रफुल डोईजळ, राजेश धारणे, भोजराज नखाते, रामेश्वर निलकंठ कारेते, साईनाथ उईके, लंकेश भजभुजे, क्रिष्णा भोयर, तरंग वाघमारे, गुलाब निकुरे, धनराज कावळे, अमित चौधरी, गणेश गुंटीवार, युजिन चौधरी, प्रशांत पेंद्राम, खुशाल कारेते, आरिफ ढवळे, संदेश सूर्यवंशी, राजेंद्र मेश्राम, पंकज गेडाम, सचिन गुरुनुले, उमेश गेडाम, धनराज ठेंगे, वामन नीलेकार, गणेश ठाकरे, राजू मुरतेली, सुप्रीम करकाडे, अरविंद ठाकरे, अजय ठाकरे, राहुल मुरतेली, कुमोद भुसारी, नामदेव भुसारी, अनिरुद्ध उरकुडे, रुपेश आवारी, स्वप्नील मंगर, साहिल उरकुडे, संदीप शिवणकर, रवी भुसारी, प्रेमचंद भुसारी, रविंद्र मिसार, निरंजन लोहंबरे, जगन चापले, प्रभुदास होळी, किशोर मडावी, नेपाल लोहंबरे, कुमदेव आवारी, आकाश भरणे, दीपक कोसमसीले, जयंत मेश्रम, कुणाल आवारी, अजिंक्य नगरडे, सूरज गिरोले, साहिल कोसमसीले, गोपाळ मोगरकर, विलास नैताम, वसंत चलाख, रुमन भांडेकर, गजानन नैताम, स्वप्नील जुमनाके, गंगाधर लटारे, मधुकर सातपुते, अमर निंबोळ, अमित हुलके, निकेश मडावी, विश्वनाथ धंदरे, विठ्ठल मंदिरकर, कवडू धंदरे, मधुकर बावणे, सुरज वलादी, पुरंदर उंदीरवाडे, मोतीराम चंद्रगिरे, अशोक धानफोले, भूषण सहारे, जयदेव मेश्राम, माणिक कारेते आदी छत्रपती सैनिक व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.







































