Home दैनंदिन बातम्या दिवाळीच्या झगमगाटावर चिनी बनावटीच्या लायटिंगचे वर्चस्व

दिवाळीच्या झगमगाटावर चिनी बनावटीच्या लायटिंगचे वर्चस्व

भारतीय मालाला मागणी का नाही? वाचा

गडचिरोली : दिवाळी म्हटले की जिकडे-तिकडे झगमगाट, आणि झगमगाट लायटिंगशिवाय होत नाही. दिवाळीच्या निमित्ताने बहुतांश घरे लायटिंगच्या सिरीजने सजविण्यात आली आहेत. पण घराघरांवर सजलेली ही लायटिंग भारतीय नसून चीनमधून आयात झालेली आहे, याची कल्पना कदाचित अनेकांना नसेल. (खाली वाचा)

गेल्या आठवडाभरापासून गडचिरोलीसह जिल्हाभरातील मार्केट दिवाळीच्या खरेदीमुळे गजबजून गेले आहे. दिवाळीत दिव्यांनी घर उजळायचे ही वर्षानुवर्षाची परंपरा आहे. पण आधुनिक काळात पारंपरिक दिव्यांसोबत विविध प्रकारची लायटिंग घरावर लावण्याची क्रेझ वाढली आहे. (खाली वाचा)

भारतीय बाजारपेठेतील ही लायटिंगची मागणी आणि गरज ओळखून चीनने विविध प्रकारच्या आकर्षक लायटिंगच्या सिरीज मार्केटमध्ये आणल्या आहेत. (खाली वाचा)

एका विक्रेत्याच्या म्हणण्यांनुसार, सध्या दिसत असलेल्या आणि विकल्या जात असलेल्या लायटिंगच्या सिरीजमधील 95 टक्के सिरीज चिनी आहेत. (खाली वाचा)

याचा अर्थ बाजारात भारतीय बनावटीच्या सिरीज उपलब्ध नाहीत, असे नाही. मात्र लोक चिनी लायटिंग सिरीजलाच का पसंती देत आहेत, यामागील कारण एका मोठ्या विक्रेत्याने स्पष्ट केले. (खाली वाचा)

ते म्हणाले, भारतीय सिरीज टिकाऊ असल्या तरीही त्या चिनी बनावटीच्या लायटिंगपेक्षा दुप्पट महाग आहेत. त्या तुलनेत चिनी सिरीज स्वस्त आहेत. शिवाय त्या अधिक प्रकाशमान होणाऱ्या असतात. त्यामुळे त्या जास्त दिवस टिकणाऱ्या नसल्या तरीही त्यांना लोक पसंती देत आहेत. (खाली वाचा)

वास्तविक लायटिंग घेणारे ग्राहक आपण घेत असलेली वस्तू भारतीय आणि की चिनी याबाबत अनभिज्ञ असतात. त्यांना स्वस्त आणि आकर्षक सिरीज पाहिजे असते. त्यामुळे तो माल कुठे निर्मित झाला हे पाहण्याच्या भानगडीत ते पडत नाहीत. (खाली वाचा)

केवळ लायटिंगच्या सिरीजच नाही, तर रंगीत कागद, पुठ्ठ्यांपासून बनविल्या जाणाऱ्या आकाश कंदिलांची जागा आता एलईडीच्या आकर्षक कंदिलांनी घेतली आहे. त्यालाही गडचिरोलीकरांकडून मोठी मागणी झाली असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.