कोनसरी लोहप्रकल्पाला भेट देऊन धर्मरावबाबांनी घेतला तयारीचा आढावा

९ ला अमित शाह यांच्या हस्ते उद्घाटन

गडचिरोली : सुरजागड लोहखाणीवर आधारित चामोर्शी तालुक्यातील कोनसरीच्या लोहखनिज प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचा शुभारंभ येत्या ९ डिसेंबर रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते होणार आहे. त्याच्या तयारीचा आढावा अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी मंगळवारी घेतला.

ना.धर्मरावबाबा यांनी कोनसरी प्रकल्पाला भेट दिली. यावेळी कार्यक्रमस्थळाची पाहणी करून लॅायड्स मेटल्स कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून तयारीचा आढावा घेतला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर, युवक जिल्हाध्यक्ष लिलाधर भरडकर, जि.प.चे माजी उपाध्यक्ष तामदेव दुधबडे, जि.प.चे माजी सभापती नाना नाकाडे, युनूस शेख, अरुण मुक्कावार, कुणाल चिलगेलवार, नेमाजी घोगरे, सौरभ खोब्रागडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.