गडचिरोली : भारतीय जनता पार्टीतर्फे सेवा संकल्प अभियानांतर्गत विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते. चित्रकला स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या कल्पकतेचे आणि कलागुणांचे दर्शन घडविले. स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षांचे संगोपन आणि पर्यावरण संरक्षणाबाबत नागरिक व विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली. या कार्यक्रमाला भाजपचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी, पालक व परिसरातील नागरिक उपस्थित होते.
सेवा संकल्प अभियानातून भाजपतर्फे चित्रकला स्पर्धा व बक्षीस वितरण
विद्यार्थ्यांच्या गुणांना चालना देण्यासाठी उपक्रम






























