चामोर्शी : दरवर्षीप्रमाणे याही वर्षी युवकांचा मैदानी उत्साह वाढविण्यासाठी 1 सप्टेंबरला चामोर्शी तालुक्यातील गौरीपूरच्या जय दुर्गा स्पोर्ट्स अँन्ड कल्चरल असोसिएशनकडून फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन माजी खासदार तथा भाजपच्या अनु.जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शना करताना नेते म्हणाले, आजच्या काळात मैदानी खेळ अतिशय महत्त्वाचे आहेत. कारण अनेक युवक वर्ग हे दिवसेंदिवस मोबाईलमध्ये व्यस्त असतात. अशावेळी त्यांच्या शरीराची हालचाल होत नाही. शरीर तंदुरुस्तीसाठी व निरोगी राहण्यासाठी अशा मैदानी खेळांची अतिशय आवश्यकता आहे. दरवर्षी गौरीपूर या ठिकाणी फुटबॉल सामन्यांचे आयोजन चांगल्या तऱ्हेने केले जाते. परिसरातील युवकांच्या तंदुरुस्तीसाठी व निरोगी राहण्यासाठी त्यांना शुभेच्छा देतो असे नेते म्हणाले. हा खेळ एक सप्ताहभर चालतो. त्यामुळे चांगल्या पद्धतीने आणि वादविवाद न करता पंचांचा निर्णय अंतिम मानून खेळ खेळावे, असे नेते म्हणाले.
असे आहेत फुटबॉल सामन्यांचे पुरस्कार
प्रथम पुरस्कार : मा.खा.अशोक नेते व जिल्हा उपाध्यक्ष डॉ.मिलिंद नरोटे यांच्याकडून (50,001 रुपये)
द्वितीय पुरस्कार : डाँ.तामदेव दुधबळे यांच्याकडून (30,001/- रुपये), आणि
तृतीय पुरस्कार : आमदार डॅा.देवराव होळी यांच्याकडून (10,001 रुपये) याप्रमाणे दिले जाणार आहे.
मान्यवरांचे ढोलताशांच्या गजरात पाहुण्यांचे स्टेजवर स्वागत करण्यात आले. माजी खासदार अशोक नेते यांनी फित कापुन उद्घाटन करत पायाने फुटबॉल उडवून प्रतियोगिता टीमच्या चमूची हातमिळवत हसताआंदोलन करून राष्ट्रगीतांने सांगता केली.
यावेळी मंचावर प्रामुख्याने भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तथा आदिवासी आघाडीचे जिल्हा प्रभारी डॉ.मिलिंद नरोटे, माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी, माजी न्यायाधीश दिक्षीत, बंगाली आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष दिपक हलदार, नगरसेविका रोशनी वरघंटे, माजी जि.प.सदस्य शिल्पा राँय, प्राचार्य बेपारी, सोशल मिडीयाचे प्रमुख तथा मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, सामाजिक नेते विष्णू ढाली, आदिवासी आघाडीचे नेते रेवनाथ कुसराम, सरपंच आशिष मुखर्जी, उपसरपंच महानंद हलदार, प्रशांत येगलोपवार, नरेश अल्लसावार, निरज रामानूजवार, हरिश माकडे, सागर हजारे, प्रतिमा सरकार, सुजित मुजुमदार, तरुण गाईन, कर्णधर बाकची, अमित मंडल, देवाशिष मंडल, परिमल राय तसेच मोठया संख्येने गावातील नागरिक व खेळाडू उपस्थित होते.
जयनगर, विक्रमपुरातही फुटबॅाल रंगात
मौजा-जयनगर/विक्रमपूर भव्य फुटबॉल स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेच्या समारोप आणि बक्षीस वितरण कार्यक्रमाला माजी खासदार तथा भाजपा अनु.जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते प्रामुख्याने उपस्थित होते. नेताजी सुभाषचंद्र बोस क्रीडा व सांस्कृतिक बहुउद्देशीय मंडळ, जयनगर/विक्रमपुरद्वारा या सामन्यांचे आयोजन केले होते.
यावेळी बोलताना अशोक नेते म्हणाले, विजयी संघाचे अभिनंदन, परंतु पराजय झालेल्या संघाने हार न मानता पुढे प्रयत्न करत राहावे, त्यांना यश नक्की मिळेल. गावातल्या कोणत्याही समस्या आणि अडीअडचणी असल्यास मी निश्चितपणे त्या सोडवण्याचा प्रयत्न करेन, असा विश्वास नेते यांनी दिला. लोकसभा निवडणुकीत प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष केलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी मतदारांचे आभार मानले.
या कार्यक्रमाला मंचावर प्रामुख्याने भाजपचे युवा नेते तथा नगरसेवक आशिष पिपरे, जयनगरच्या माजी सरपंच प्रतिमा सरकार, भाजपचे सक्रिय नेते रतन सरकार, सामाजिक नेते विष्णू ढाली, सोशल मिडीयाचे प्रमुख तथा मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, ठाकुरदास सरकार, प्रियतोष मंडल, देवकुमार मंडल, नरेंद्र हलदार, किशोर साना, अपूर्व वैद्य, हेमंत सरकार तसेच मंडळाचे पदाधिकारी व मोठया संख्येने गावातील नागरिक तथा विद्यार्थी उपस्थित होते.