महाविकास आघाडीचे डॅा.किरसान आज शेवटच्या दिवशी भरणार नामांकन

ना.विजय वडेट्टीवार राहणार उपस्थित

गडचिरोली : महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून काँग्रेस नेते डॅा.नामदेव किरसान बुधवारी नामांकन दाखल करणार आहेत. सकाळी ११ वाजता अभिनव लॅान येथे जमून विधानसभेचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात तेथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली काढली जाणार आहे.

यावेळी महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षासह शिवसेना (उबाठा) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे पदाधिकारीही उपस्थित राहून एकजूट दाखवतील, असे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडी यांनी सांगितले.

बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असून दुपारी ३ वाजेपर्यंतची मुदत आहे. आतापर्यंत दाखल नामांकनांची स्थिती पाहता यावेळी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत रंगणार असल्याचे दिसून येते.