अहेरीत भाजपच्या ‘घर चलो’ सदस्यता मोहिमेला मिळाला उत्साहात प्रतिसाद

मा.खा.नेते यांचा सर्वसामान्यांशी संवाद

अहेरी : विधानसभा क्षेत्रात भारतीय जनता पक्षाच्या सदस्यता नोंदणी अभियानांतर्गत ‘घर चलो’ अभियान मोठ्या उत्साहात पार पडले. या अभियानाचे नेतृत्व माजी खासदार तथा भाजपच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते यांनी केले. यावेळी नेते यांनी अहेरीतील विविध क्षेत्रातील सर्वसामान्य नागरिकांच्या घरी आणि दुकानांना भेटी देऊन त्यांच्याशी संवाद साधला. अहेरीतील नागरिकांनी त्यांना भरभरून प्रतिसाद दिला.

‘समर्थ आणि विकसित भारत’ घडविण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या व्हर्च्युअल बैठकीनंतर, त्यांच्या सूचनेनुसार हा उपक्रम राबवण्यात आला.

अहेरी येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरात मोहिमेची सुरुवात झाली. मा.खा. अशोक नेते यांनी दुकानदार, पानठेलेचालक, फुटपाथवरील दुकानदार, चहावाले आणि घरोघरी जाऊन नागरिकांना भाजपचे सदस्य होण्यासाठी प्रवृत्त केले. त्यांनी जनतेशी संवाद साधत भाजप परिवाराचा भाग बनण्याचे आवाहन केले.

प्रमुख सहकार्य आणि सहभाग

या अभियानात तिरुपती बद्दीवार, साईनाथ मुनूरवार, रवी सिल्लमवार, यश गुप्ता, तगतसिंग राजपुरोहित, रवी जोरीगलवार, महेबुब खान पठान, तृप्ती मद्देर्लावार, जयश्री मद्देर्लावार, मधुकर नामेवार, रमेश समुद्रवार, लक्ष्मी मद्दीवार यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेतला.

यावेळी भाजपचे जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, जिल्हा उपाध्यक्ष विनोद आकनपल्लीवार, तालुका अध्यक्ष संतोष मद्दीवार, शहराध्यक्ष मुकेश नामेवार, ता.महामंत्री सुकमा हलदार, रमेश समुद्रवार, नगरसेविका शालिनी पोहनेकर, महिला नेत्या किरण भांदककर, लक्ष्मी मद्दीवार, वैशाली देशपांडे, गुड्डू ठाकरे, प्रशांत डोंगे, दिनेश येनगंटीवार, पद्मा शेडमेक, रमेश मडावी, राजू पेंदाम यांच्यासह तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.