गडचिरोली : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विभागाचे मंत्री नितेश राणे बुधवार, दि.4 जून रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. (सविस्तर बातमी खाली वाचा)

सायंकाळी 4 वाजता गडचिरोली येथे आगमन झाल्यानंतर ते पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतील. त्यानंतर सायंकाळी 6 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात नागपूर विभागातील मत्स्यव्यवसाय विभागाची आढावा बैठक घेतील आणि त्यानंतर सोयीनुसार नागपूरकडे प्रयाण करतील.