गडचिरोली : आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने दिनांक अहेरी विधानसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीला खासदार डॅा.नामदेव किरसान, निरीक्षक अॅड.सचिन नाईक, जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, माजी आ.पेंटाराम तलांडी यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
अहेरी विधानसभा क्षेत्रातील अहेरी, मुलचेरा, भामरागड, एटापल्ली व सिरोंचा तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, माजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य तसेच कार्यकर्त्यांनी या महत्वपूर्ण बैठकीला हजेरी लावली. यावेळी आगामी निवडणुकांसाठी संघटनात्मक तयारी, स्थानिक प्रश्नांची प्रभावी मांडणी आणि मतदारांशी सशक्त संवाद यावर भर देण्यात आला. पक्षशिस्त, गटबाजी टाळणे आणि सर्वसमावेशक नेतृत्वाच्या माध्यमातून यश संपादन करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. (अधिक बातमी खाली वाचा)

बैठकीला माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडलावार, अहेरी तालुका अध्यक्ष पप्पू हकीम, एटापल्ली तालुकाध्यक्ष रमेश गंपावार, सिरोंचा तालुका अध्यक्ष सतीश जवाजी, भामरागड तालुका अध्यक्ष लक्ष्मीकांत बोगामी, अनुसूचित जाती सेलचे अध्यक्ष किशोर शंभरकर, हनिफ शेख, माजी जि.प.सदस्य सुनिता कुसनाके, माजी सभापती भास्कर तलांडे, संचालक मल्लीकाअर्जुन आखुला, माजी उपसभापती गिता चातुरकर, माजी नगरपंचायत उपाध्यक्ष विष्णू मडावी, उपाध्यक्ष अल्पसंख्यांक सेल रिजवान शेख, शौभान कोडावार, अज्जु पठाण, गणेश उपलावार, उषा आत्राम, शाहजिदा पठाण यांची उपस्थिती होती.