आदिवासी एकता परिषदेची जिल्हास्तरीय परिवर्तन यात्रा

22 ला नागपुरात महारॅली

गडचिरोली : जिल्ह्यातील आदिवासीबहुल सावरगांव येथे राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेच्या वतीने जिल्हास्तरीय परिवर्तन यात्रा काढण्यात आली. या यात्रेचे नेतृत्व राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद नवी दिल्लीचे राष्ट्रीय अध्यक्ष विरसिंग राणा, मध्यप्रदेश प्रदेशाध्यक्ष भेरुलाल इमलियार, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राम ढिगर यांनी केले.

येत्या 22 फेब्रुवारीला नागपूर येथील आरएसएस मुख्यालयावर संपूर्ण भारतातून महारॅली काढण्यात येणार आहे. भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम हे या महारॅलीचे नेतृत्व करतील. ही महारॅली ईव्हीएम मशीनच्या विरोधात, ओबीसींची तसेच प्रत्येक जातींची जातवार जनगणना करण्यासाठी , बामसेफचे 41 वे आणि भारत मुक्ती मोर्चाचे 14 वे राष्ट्रीय अधिवेशन ओडीसा सरकारने रद्द केल्याच्या विरोधात, संविधानानुसार देश चालावा, खाजगीकरणाला विरोध अशा विविध मुद्दयांना धरून काढण्यात येणार आहे.

ही परिवर्तन यात्रा यशस्वी होण्यासाठी बामसेफचे जिल्हाध्यक्ष भोजराज कान्हेकर व राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे जिल्हाध्यक्ष वर्षा कन्नाके यांनी परिश्रम घेतले.