Home दैनंदिन बातम्या अहेरी व आलापल्ली बस स्थानकात प्रवाशांसाठी वॅाटर कुलरची सुविधा

अहेरी व आलापल्ली बस स्थानकात प्रवाशांसाठी वॅाटर कुलरची सुविधा

आ.धर्मरावबाबा आत्राम यांचा पुढाकार

अहेरी : दक्षिण गडचिरोलीचे केंद्र असलेल्या अहेरी व आलापल्ली बस स्थानकांवर प्रवाशांच्या सुविधेसाठी आमदार डॉ.धर्मरावबाबा आत्राम यांच्या सौजन्याने थंड पाण्यासाठी वॉटर कुलिंग मशीनची सोय करण्यात आली. सिनेट सदस्य तथा राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष तनुश्री आत्राम यांच्या हस्ते या सुविधेचे लोकार्पण करण्यात आले.

या दोन्ही बस स्थानकांवरून मोठ्या प्रमाणात प्रवाशी विविध भागात जात असल्यामुळे ही बस स्थानके नेहमी गजबजलेली असतात. पण स्थानकावर शुद्ध आणि थंड पिण्याच्या पाण्याची सुविधा नव्हती. ही अडचण आ.धर्मरावबाबा आत्राम यांनी दूर केली.

वॅाटर कुलरच्या लोकार्पणप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) पदाधिकारी, कार्यकर्ते, अहेरी आगाराचे आगार प्रमुख तसेच मोठ्या संख्येने प्रवासी उपस्थित होते.