मोबाईलपेक्षा मैदानाशी नाते जोडा, ब्राम्हणवाडे यांचे आवाहन

ग्रामीण कबड्डी व व्हॉलीबॉल स्पर्धा

एटापल्ली : सार्वजनिक नवयुवक क्रीडामंडळ, जीवनगट्टा यांच्या सौजन्याने आयोजित ग्रामीण कबड्डी व व्हॉलीबॉल स्पर्धांचे उद्घाटन गडचिरोली काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या हस्ते करण्यात आले. कबड्डी व व्हॉलीबॉलसारखे खेळ शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक एकाग्रता आणि संघभावना विकसित करतात. ग्रामीण भागातील युवकांनी मोबाईल व अन्य व्यसनांपासून दूर राहून खेळाकडे वळावे. नियमित सराव, शिस्त आणि कठोर परिश्रम यांच्या जोरावर जिल्हा, राज्य व राष्ट्रीय पातळीवर यश संपादन करावे, असे आवाहन ब्राह्मणवाडे यांनी यावेळी बोलताना केले.

या कार्यक्रमाला माजी जि.प. सदस्य तथा संचालक (आदिवासी विकास महामंडळ, नाशिक) सैनु गोटा, तालुका अध्यक्ष वसंत राऊत, काँग्रेसचे प्रज्वल नागुलवार, एटापल्लीचे नगरसेवक मनोहर बोरकर, किसान हिचामी, निजाम पेंदाम, महिला तालुका अध्यक्ष ताराताई गावडे, नगरसेविका सरिता गावडे, उषा ठाकरे, माजी सरपंच दिवाकर निसार यांच्यासह लोकनाथ गावडे, धिवरू मेश्राम, श्रीनिवास ताडपल्लीवार, विपुल येल्टीवार, संपत करमरकर, रेणुजी हिचामी, संभाजी हिचामी, देवाजी अरमा आदी मान्यवर, ग्रामस्थ, क्रीडाप्रेमी तसेच युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.