Home दैनंदिन बातम्या आदिवासी एकता युवा समितीच्या वतीने बिरसा मुंडा जयंती महोत्सव

आदिवासी एकता युवा समितीच्या वतीने बिरसा मुंडा जयंती महोत्सव

गोंडी गीतांचा सांस्कृतिक कार्यक्रम

गडचिरोली : महान क्रांतिकारक आणि जल, जंगल, जमीन या हक्कांसाठी संघर्ष करणारे धरतीआबा भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त 18 नोव्हेंबर रोजी गोकुळनगरात भव्य जयंती महोत्सवाचे आयोजन केले होते. बिरसा मुंडा चौक येथे आदिवासी एकता युवा समितीच्या वतीने आयोजित या जयंती महोत्सवात गोंडी गीतांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाने वेगळीच रंगत आणली.

या कार्यक्रमाला बिरसा ब्रिगेडचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष इंजि.सतीश पेंदाम, प्राचार्य डॉ.दिलीप चौधरी, प्रदेशाध्यक्ष वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद तथा सिनेट सदस्य, गोंडवाना विद्यापीठ यांची विशेष उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या माध्यमातून भगवान बिरसा मुंडा यांच्या महान कार्याचे स्मरण करून त्यांच्या क्रांतिकारी विचारांचा, आदिवासी अस्मितेचा, संस्कृतीचा आणि जल-जंगल-जमिनीच्या हक्कांचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या जीवनकार्यावर आणि आदिवासी समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक प्रगतीवर मार्गदर्शन केले.

या महोत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे खास तेलंगणा राज्यातून आलेला रवी मेश्राम यांचा गोंडी गीतांचा ऑर्केस्ट्रा आणि एस.आर. डान्स अकॅडमीने सादर केलेले समूह नृत्य हा होता. गोंडी गीतांच्या तालावर आणि आदिवासी संस्कृतीच्या रंगात न्हाऊन जात उपस्थितांनी यात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. पारंपरिक आदिवासी कला, संस्कृती आणि संगीताच्या माध्यमातून कार्यक्रमस्थळी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

या जयंती महोत्सवाच्या आयोजनातून आदिवासी समाजातील एकता, बंधुभाव, सांस्कृतिक वारसा आणि भगवान बिरसा मुंडा यांचे विचार पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संदेश देण्यात आला.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार डॉ.देवराव होळी, ज्येष्ठ साहित्यिक कुसुम अलाम, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त डॉ.सचिन मडावी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे जिल्हाप्रमुख पवन गेडाम, राष्ट्रीय अनुसूचित जाती जनजाती विकास परिषदेचे प्रदेशाध्यक्ष डॉ.नरेंद्र उंदीरवाडे, आझाद समाज पार्टीचे राज बन्सोड, प्रदेश महिला सचिव माधुरी मडावी, प्रकाश अर्जुनवार, प्रा हितेश मडावी, डॉ.पंकज कुळसंगे व अॅड भैयाजी उईके, महाग्रामसभा अध्यक्ष नितीन पदा, महाग्रामसभेचे सचिव शिवाजी नरोटे, कै.बाबुराव मडावी स्मारक समितीचे अमोल कुळमेथे, उपाध्यक्ष सुधीर मसराम, सचिव प्रदीप कुळसंगे, मंगेश नैताम, गिरीश उईके, प्रियदर्शन मडावी, मुकुंदा मेश्राम, संघटक संजय मेश्राम, माणिक गेडाम, संजय उईके, समितीचे सदस्य वासुदेव कोडापे, उमेश उईके, प्रशांत मडावी, आकाश कोडापे, योगेश मडावी, प्रफुल कोडापे, डॉ.कीर्तिकुमार उईके, निलेश कोडापे, रमेश चिकराम, हेमा कुळसंगे, सोनिया टेकाम, प्रवीण कोवे, अशा सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे संचालन अन्नपूर्णा मसराम व सचिव प्रदीप कुळसंगे यांनी, तर प्रास्ताविक सल्लागार प्रियदर्शन मडावी यांनी केले.