गडचिरोली : भारतीय जनता पार्टी अनुसूचित जमाती मोर्चाच्या संघटनात्मक विस्ताराला बळकटी देण्याच्या दृष्टीने श्रीमंत संतोष सुरपाम यांची अनुसूचित जमाती मोर्चाच्या प्रदेश सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ.देवराव होळी यांच्या हस्ते त्यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले.


अनुसूचित जमाती समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी समाजातील विविध प्रश्न, समस्या आणि प्रलंबित मागण्या शासनदरबारी तसेच संघटनेच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडणे, समाजातील नागरिकांना संघटनेशी जोडणे, पक्षाची ध्येयधोरणे आणि विचारधारा तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचविणे, तसेच संघटनात्मक कार्य अधिक व्यापक व मजबूत करणे, अशी महत्त्वपूर्ण जबाबदारी प्रदेश सदस्य म्हणून श्रीमंत संतोष सुरपाम यांच्यावर सोपविण्यात आली आहे.








































