गडचिरोली : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसअंतर्गत आदिवासी काँग्रेसने गडचिरोली जिल्ह्यात खांदेपालट करत जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी माधवराव गावळ यांच्याकडे दिली आहे. प्रदेशाध्यक्ष तथा माजी शिक्षणमंत्री प्रा.वसंत पुरके यांनी गावळ यांना नियुक्तीचे पत्र पाठवले. आतापर्यंत ही धुरा हनुमंतू मडावी यांच्याकडे होती.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मान्यतेनंतर ही नियुक्ती करण्यात आली. सामाजिक स्तरावर अनेक वर्षांपासून सक्रिय असलेल्या गावळ यांच्या या नियुक्तीमुळे आदिवासी काँग्रेसमध्ये नवचैतन्य निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच पक्षाची विचारधारा बळकट करत आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी प्रभावीपणे लढा उभारावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
































