Home दैनंदिन बातम्या सिरोंचा–आलापल्ली मार्गावर जड वाहतुकीस 31 ऑक्टोबरपर्यंत प्रतिबंध

सिरोंचा–आलापल्ली मार्गावर जड वाहतुकीस 31 ऑक्टोबरपर्यंत प्रतिबंध

अत्यावश्यक सेवा, प्रवासी बसेसला सूट

गडचिरोली : राष्ट्रीय महामार्ग क्र.353-सी वरील सिरोंचा–आलापल्ली मार्गावर सुरू असलेल्या महामार्ग बांधकामामुळे आणि पावसाळ्यातील संभाव्य धोके लक्षात घेऊन या मार्गावरील सर्व प्रकारच्या जड वाहनांच्या वाहतुकीस 7 जुलै 2026 रोजी मध्यरात्रीपासून 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत प्रतिबंध करण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी व अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अविश्यांत पंडा यांनी मोटार वाहन कायदा, 1988 मधील तरतुदींनुसार हा आदेश जारी केला आहे. मात्र आपत्कालीन सेवा, प्रवासी बस, पाणीपुरवठा, पोलीस, अन्न व औषध पुरवठा, महावितरण, दूरसंचार, आरोग्य विभाग तसेच रस्ते दुरुस्तीशी संबंधित वाहनांना या आदेशातून वगळण्यात आले आहे.

जड वाहनांनी सिरोंचा– मंचेरियाल– राजुरा– बल्लारशाह– चंद्रपूर– गडचिरोली तसेच आलापल्ली– आष्टी– बल्लारपूर–मंचेरियाल या पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर प्रचलित कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी कळविले आहे.