गडचिरोली : रेगडी-हळदवाही जिल्हा परिषद क्षेत्रातील समस्त बुथ प्रमुखांचे बीएलए 2 आणि एसआयआर प्रशिक्षण वर्ग मौजा गोविंदपूर येथील हॉटेल व्हिला अर्बन सभागृहात संपन्न झाले. सर्व कामे आणि जबाबदाऱ्या वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष डॅा.प्रणय खुणे यांनी केले.
या प्रशिक्षण वर्गात मार्गदर्शक म्हणून भाजपा जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, जेष्ठ नेते भारत खटी, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रणय खुणे, किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष विलास पाटील भांडेकर, युवा मोर्चाचे जिल्हा महामंत्री आकाश सातपुते, मोरेश्वर भांडेकर, घोट मंडळ अध्यक्ष राकेश सरकार,
तसेच गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे एसआयआर प्रमुख हरीश माकडे उपस्थित होते.
SIR च्या दुसऱ्या टप्यात (30 जून ते 28 जुलै) प्रत्येक बुथवर बुथप्रमुख (BLA-2) निश्चित करून घेणे, व सरकारी BLO सोबत मतदार फॅार्म वितरण, फॅार्म भरुन घेणे या सर्व प्रक्रियेत सहभागी होऊन SIR अभियान यशस्वी करणे, तसेच पात्र नागरिकांना मतदार करून घेणे तथा पदाधिकारी यांचे आॅनलाईन प्रशिक्षण पूर्ण करुन घेणे, आदी महत्वपूर्ण विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी रेगडी हळदवाही पंचायत समिती क्षेत्रातील क्षेत्र प्रमुख विनोद किरमे, पलाश घरामी, राजू सातपुते, संदीप भोवरे, सुमेन विस्वास, सोम वैद्य, तारक हलदार, महेश विस्वास व जिल्हा परिषद क्षेत्रातील समस्त बुथ प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
































