गडचिरोली : जनगणनेत ओबीसींची स्वतंत्र गिनती करणारा कॅालम टाकण्यासह ओबीसींच्या इतर प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आयोजित ओबीसी काँग्रेसची मंडल यात्रा आज (रविवारी) जिल्ह्यात तीन ठिकाणी येणार आहे. यावेळी मुख्य अतिथी म्हणून काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह काँग्रेसचे ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॅा.यशपाल भिंगे, तसेच राष्ट्रीय समन्वयक अजय हटेवार, पूर्व विदर्भ समन्वयक मोरेश्वर भादे आदी उपस्थित राहणार आहेत. (अधिक बातमी खाली वाचा)

ही मंडल यात्रा आज (दि.9) दुपारी 2 वाजता देसाईगंज येथे पोहोचल्यानंतर विश्रामगृहासमोर कॅार्नर सभा होणार आहे. त्यानंतर 3 वाजता आरमोरी येथे आगमन मंडल यात्रा पोहोचेल. तेथील स्वागतानंतर 4 वाजता गडचिरोलीतील इंदिरा गांधी चौकात आगमन व जाहीर सभा होणार असल्याचे ओबीसी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज ढोरे यांनी कळविले.
या यात्रेत जिल्ह्यातील काँग्रेसचे सर्व लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी सहभागी होतील. काँग्रेसच्या सर्व सेलमधील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा काँग्रेस कमिटी, युवक काँग्रेस, विद्यार्थी काँग्रेस, ओबीसी काँग्रेस कमिटीने केले आहे.
































