Home दैनंदिन बातम्या जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण उत्साहात

जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण उत्साहात

अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची हजेरी

गडचिरोली : देशाच्या 80 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने गडचिरोलीतील कोहळे बिल्डिंग, चामोर्शी रोड येथील कार्यालयात स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम उत्साहात व देशभक्तीमय वातावरणात संपन्न झाला. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव पंकज गुड्डेवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी उपस्थित काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत स्वातंत्र्य संग्रामातील हुतात्मे, स्वातंत्र्यसैनिक तसेच देशाच्या प्रगतीसाठी योगदान देणाऱ्या महान व्यक्तींना अभिवादन केले.

यावेळी माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, गटनेते तथा नगरसेवक सतीश विधाते, नगरसेवक रमेश चौधरी, अनुसूचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, प्रभाकर वासेकर, ज्येष्ठ नेते हरबाजी मोरे, शंकरराव सालोटकर, नगरसेवक श्रीकांत देशमुख, नगरसेवक पराग पोरेड्डीवार, नगरसेवक नंदू कायरकर, नगरसेविका मनिषा खेवले, नगरसेविका मेघा वरगंटीवार, सोशल मीडिया प्रदेश उपाध्यक्ष नंदू वाईलकर, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितेश राठोड, परिवहन सेलचे जिल्हाध्यक्ष रुपेश टिकले, सोशल मीडियाचे जिल्हाध्यक्ष संजय चन्ने, शिक्षक सेलचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय खरवडे, पंचायत राजचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र डोंगरे, आदिवासी सेलचे जिल्हाध्यक्ष माधवराव गावळ, किसान सेलचे जिल्हाध्यक्ष वामनराव सावसागडे, आनंद पारधी, सुखदेव वासनिक, मारोती अलोने, रतन शेंडे, वसंत कुलसंगे, हेमंत मोहितकर, तालुकाध्यक्ष वसंत राऊत, महादेव पाटील भोयर, उत्तम ठाकरे, पांडुरंग घोटेकर, संजय मेश्राम, बालू मुप्पिडवार, स्वप्निल बेहेरे, पुष्पलता कुमरे, सुनील चडगुलवार, राजू आखाडे, प्रदेश सचिव प्रतीक बारसिंगे, निखिल खोब्रागडे, जितू पाटील मुनघाटे, कल्पना नंदेश्वर, माधुरी मडावी, रिता गोवर्धन, पौर्णिमा भडके, मंजुषा आत्राम, रोषणा शिंपी, सुषमा भडके, अनिता डोईजड, आशा पातरडे, संध्या उईके, नलिनी कोवे, कविता उराडे, शालिनी पेंदाम, पुष्पा कुमरे, मंगला भोयर, शितल ठवरे, मीनल चिमूरकर, विमल भोयर, मीनाक्षी रामटेके, मिलिंद बारसागडे, प्रभाकर भोयर, प्रकाश शिंदे, सुभाष हेमके, कृष्णाराव नारदेलवार, दीपक रामने, कुणाल ताजने, विठ्ठलराव मापारी, दिनेश सिडम, अनिल खेवले, नितीन चलाख, संतोष भांडेकर, लालाजी सातपुते, अशोक चलाख, सुशील पाराशर, जावेद खान, साहिल वडेट्टीवार यांच्यासह मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी स्वातंत्र्य, लोकशाही, संविधान आणि देशाच्या एकात्मतेची मूल्ये अधिक बळकट करण्याचा, तसेच संविधानिक मूल्यांचे संरक्षण करण्याचा संकल्प उपस्थितांनी केला.