गडचिरोली : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती शाखा गडचिरोलीच्या वतीने डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतिदिनाचा कार्यक्रम अंनिस गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष प्रा.मुनिश्वर बोरकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी चंद्रशेखर भडांगे, तुळशीदास सहारे, दशरथ साखरे, प्रा.आनंद दहेगावकर, लता रामटेके आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी अंनिसचे चंद्रशेखर भडांगे म्हणाले, ‘डॉ.दाभोळकर यांनी अंधश्रद्धा निर्मुलनाचे कार्य आयुष्यभर केले. त्यांनी अंधश्रद्धा नष्ट करण्याकरीता शेवटच्या श्वासापर्यत प्रयत्न केले. त्यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे. याप्रसंगी तुळशीदास सहारे यांनी डॉ.दाभोळकर यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला, तर प्रा.मुनिश्वर बोरकर यांनी अंधश्रद्धा निर्मुलनाचे कार्य विज्ञानवादावर आधारित असले पाहिजे तरच अंधश्रद्धा दूर होईल असे सांगत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास किशोर मेश्राम, नामदेव दुधे, नेताजी मेश्राम, मिलिंद अंबादे, माधव वैद्य, लवंकुश भैसारे, प्रेमदास रामटेके, मोरेश्वर निमगडे, जीवन मेश्राम, रोशन उके, दामोधर शेंडे, खेमदेव हस्ते, हेमंत बारसागडे, केतन हेडाऊ, संघमित्रा राजवाडे, लता भैसारे, प्रेमलता कान्हेकर, मंगला ब्राम्हणवाडे, लिला वाकडे, देवलाबाई शेंडे, बासुदा शेख यांच्यासह बहुसंख्य अंनिस कार्यकर्ते उपस्थित होते.
































