Home दैनंदिन बातम्या कलार समाज संघटनेचा कोजागिरी व स्नेहमिलन सोहळा उत्साहात

कलार समाज संघटनेचा कोजागिरी व स्नेहमिलन सोहळा उत्साहात

एकत्रि‍करणाने सामाजिक एकोप्याचे दर्शन

गडचिरोली : कलार समाज संघटना गडचिरोलीच्या वतीने येथील अभिनव लॉनवर कोजागिरी व स्नेहमिलन सोहळा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाला. या कार्यक्रमाला कलार समाजातील विविध भागांतून समाजबांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे उद्घाटन चंदू पाटील मारकवार, राजगड यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी संघटनेचे नागपूर जिल्हाध्यक्ष गजानन पटले होते. प्रमुख अतिथी म्हणून नारायण गौड सिल्लेवार (चंद्रपूर), फाल्गुन ऊके (नागपूर), वीणा पटले (महिला अध्यक्ष, नागपूर), बाळयाजी गौड, विठ्ठल गौड गुरमवार, भारतगौड कोंडरा (चंद्रपूर), नरसिंग सेठ गणवेनवार (मूल), रवी वासेकर, हेमंत जंबेवार, गणेश पुल्लुरवार, संजय गणवेनवार, निरंजन पाटील वासेकर, दामदेव मंडलवार, सुनील चडगुलवार, अनिल तिडके, प्रीती मेश्राम आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना उद्घाटक चंदू पाटील मारकवार म्हणाले, कलार समाजातील सर्व प्रवर्गांना एकत्र आणण्याचा आयोजकांचा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे. समाज हा परिवर्तनशील असला पाहिजे. समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी सर्वांनी संघटितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे.

गुणवंत विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व सेवानिवृत्तांचा गौरव

या कार्यक्रमात समाजातील 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तसेच दहावी व बारावीच्या परीक्षेत 80 टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त करणारे अथर्व निरंजन पाटील वासेकर, साई किरण अजय मारकवार, धनश्री ज्ञानेश्वर ठलाल तसेच बी.फार्म. पदवी प्राप्त केलेली समृद्धी श्रीनिवास दोरीवर आणि एमबीबीएस पदवी प्राप्त केलेली अनुजा विलास मेश्राम यांचा रोख रक्कम, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

याशिवाय सेवानिवृत्त झालेल्या दिलीप शिवाजी मेश्राम, रेखाताई प्रभाकर देवलवार, मल्लेशजी वंगेवार, रेखाताई कीर्तनलाल मेश्राम, प्रकाशजी मासुरकर व नंदकिशोर मांडवे यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. या स्नेहमिलन सोहळ्यामुळे समाजातील सर्व घटक एकत्र आले असून सामाजिक एकोपा, संघटनशक्ती व समाजाच्या सर्वांगीण विकासाचा सकारात्मक संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील चडगुलवार यांनी, सूत्रसंचालन विना जंबेवार यांनी, तर आभार प्रदर्शन संगीता अतकमवार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कीर्तनलाल मेश्राम, व्यंकटेश कंबगौनी, मल्लेश वंगेवार, मोरेश्वर वालोदे, दिलीप गडपल्लीवार, विजय मारकवार, प्रभाकर देवलवार, दिलीप मेश्राम, राजू गडपल्लीवार, मनोज मारगोनवार, प्रभाकर मंडावार, नरेंद्र बोरकर व सतीश शंकरवार यांनी परिश्रम घेतले.