मुंबईतील काँग्रेसच्या महामेळाव्याला गडचिरोलीतून शेकडो पदाधिकारी जाणार

राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त आयोजन

गडचिरोली : देशाचे माजी पंतप्रधान, भारतरत्न स्व.राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने येत्या 20 ऑगस्ट रोजी मुंबई येथील बीकेसी मैदानावर महामेळाव्याचे आयोजन केले आहे. त्यात सहभागी होण्याकरीता आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नियोजनाकरीता गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी जिल्ह्यातील शेकडो पदाधिकारी आणि हजारो काँग्रेस कार्यकर्ते मुंबईच्या महामेळाव्यास उपस्थित राहतील, असा निर्धार व्यक्त करण्यात आला.

या बैठकीला माजी खासदार मारोतराव कोवासे, माजी आमदार आनंदराव गेडाम, शहर अध्यक्ष सतीश विधाते, महिला जिल्हाध्यक्ष कविता मोहरकर, माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडलावार, माजी जि.प.उपाध्यक्ष मनोहर पोरटी, माजी जि.प. उपाध्यक्ष तथा कुरखेडा तालुकाध्यक्ष जीवन नाट, सगुणा तलांडी, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव विश्वजित कोवासे, प्रदेश सचिव अतुल मल्लेलवार, हनुमंत मडावी, प्रभाकर वासेकर, पुष्पलता कुमरे, शंकरराव सालोडकर, अनिल कोठारे, अब्दुल पंजवानी, छगन शेडमाके, वामनराव सावसाकडे, रजनीकांत मोटघरे, भारत येरमे, डॉ.सोनल कोवे, रामदास मसराम, डॉ.शिलूताई चिमूरकर, तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, प्रमोद भगत, प्रशांत कोराम, राजेंद्र बुल्ले, मनोज अग्रवाल, प्रमोद गोटेवार, डॉ.पप्पू हकीम, लक्ष्मीकांत बोगामी, मुस्ताक हकीम, देवाजी सोनटक्के, नेताजी गावतुरे, सुनील चडगुलवार, हरबाजी मोरे यांच्यासह मोठ्या संख्येने पक्षाचे कर्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.