आरमोरी व बदलापूरच्या मुलींवर अत्याचार करणाऱ्यांना त्वरित शिक्षा करा

इंडिया आघाडीच्या वतीने निवेदन

आरमोरी : येथील टी-पॅाईंटजवळ असलेल्या रेस्टॉरंटमध्ये युवतीला जबर मारहाण करणाऱ्या आरोपी सोहेल शेख व अयुब शेख यांच्यावर कठोर कारवाई करावी, तसेच बदलापूर येथील दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणाऱ्या अक्षय शिंदेवर त्वरित फास्ट ट्रॅक कोर्टात केस करून फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी इंडिया आघाडीचा वतीने करण्यात आली.

मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या नावे यासंदर्भात निवेदन देऊन मागणी करण्यात आली. निवेदन देताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संदीप ठाकुर, शिवसेनेच्या लक्ष्मी मने, वेणुताई ढवगाये, युवारंगचे राहुल जुवारे, लिलाधर मेश्राम, काँग्रेस पक्षाचे विजय सुपारे, निशांत वनमाळी, सचिव सपाटे, शिवसेनेचे सागर मने, राजू अंबानी, माणिक भोयर, प्रहारचे निखिल धार्मिक, विनोद निमजे, माकपाचे अमोल मारकवार, तसेच रंजीत बनकर, महेंद्र शेंडे, अंकुश गाढवे, मेघा मने, योजना मेश्राम, विभा बोबाटे, आशुतोष गिरडकर, कृष्णा भरने, ज्ञानेश्वर ढवगाये, चेतन जुवारे, विलास दाणे इत्यादी सहकारी उपस्थित होते.