मंत्री धर्मरावबाबा आत्राम आज एटापल्ली तालुक्याच्या दौऱ्यावर

विद्यार्थ्यांच्या सत्कारासह जनसंवाद

गडचिरोली : राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम शुक्रवार, दि.20 सप्टेंबर रोजी एटापल्ली तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. सकाळी 10.45 वाजता त्यांचे एटापल्ली येथे हेलिकॅाप्टरने आगमन होईल. क्रीडा संकुल येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेत त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार होणार आहे. सकाळी 11.45 वाजता भगवंतराव महाविद्यालय, एटापल्ली येथून पिपली बुर्गीकडे प्रयाण करतील. दुपारी 12 ते 1 ही वेळ राखीव असून त्यानंतर दुपारी 1 ते 3 दरम्यान पिपली बुर्गी येथे जनसंवाद कार्यक्रमाला उपस्थित राहतील. त्यानंतर अहेरीला येऊन राजवाडा निवासस्थान येथे मुक्काम करतील.