गडचिरोली जिल्ह्याची दशा आणि दिशा लक्षात घेऊन औद्योगिक धोरण ठरवा

डॅा.साळवेंची मुख्य सचिवांकडे मागणी

गडचिरोली : विकासाचा लाभ सर्वांनाच झाला पाहिजे. गडचिरोली जिल्ह्याची दशा आणि दिशा लक्षात घेऊन या जिल्ह्यासाठी औद्योगिक धोरण ठरविण्याची विनंती काँग्रेस नेते डॅा.प्रमोद साळवे यांनी राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्याकडे केली. डॅा.साळवे यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान त्यांची भेट घेऊन विदर्भभूमीत स्वागत केले आणि त्यांच्याशी चर्चा केली.

याशिवाय डॅा.साळवे यांनी उपसचिव प्रकाश इंदलकर यांचीही भेट घेऊन त्यांचे स्वागत केले. गडचिरोली हा आदिवासीबहुल दुर्गम भाग असल्याने आतापर्यंत दुर्लक्षित होता. पण अलिकडे विकासाच्या प्रवाहात येत आहे. असे असले तरी या जिल्ह्याला विकासाचा टप्प्यात आणण्यासाठी शासनाकडून भक्कम पाठबळाची गरज आहे. त्यासाठी परिपूर्ण नियोजन आवश्यक असल्याचे डॅा.साळवे यांनी या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचविले.