Home पब्लिक प्रॉब्लेम सिरोंचात राष्ट्रवादी काँग्रेसकडून ‘एक हात मदतीचा’ उपक्रम

सिरोंचात राष्ट्रवादी काँग्रेसकडून ‘एक हात मदतीचा’ उपक्रम

आ. धर्मरावबाबा आत्राम यांच्याहस्ते गरजूंना विविध कार्डचे वाटप

सिरोंचा : जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून ‘एक हात मदतीचा’ हा उपक्रम सुरू आहे. मागील वर्षभरापासून सुरू असलेल्या या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील गरजू नागरिकांना विविध कार्ड तयार करून दिले जात आहेत. याअंतर्गत सिरोंचा तालुक्यातील विविध गावांतील 100 गरजू नागरिकांना अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते आभा कार्ड, ई-श्रम कार्ड, तसेच पॅन कार्डचे वाटप करण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सिरोंचा तालुकाध्यक्ष मधुकर कोल्लुरी, एम डी शानू, फिरोज खान, मदानायय्या मादेशी, नागराज गणपती, वेंकटेश गडपूरपवार आदी पदाधिकारी उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष आणि माजी जि. प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम तथा सिनेट सदस्य तनुश्री आत्राम यांच्या नेतृत्वात ‘एक हात मदतीचा’ हा उपक्रम सुरू आहे. या उपक्रमामुळे जिल्हाभरातील खेड्यापाड्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. शासकीय योजनांसाठी लागणारे विविध कार्ड तयार करून मिळावे या उदात्त हेतूने सिरोंचा तालुक्यातील महिला, पुरुष, युवक आणि युवतींनी कागदपत्रे जमा केली होती. अवघ्या काही दिवसांतच विविध कार्ड तयार करून त्याचे वाटप करण्यात आले.

विविध कार्यालयात अनेकदा चकरा मारूनही हे कार्ड वेळेवर मिळत नव्हते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुरू असलेल्या या उपक्रमामुळे येथील नागरिकांना हे कार्ड तयार करून मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.