Home दैनंदिन बातम्या हृदय तपासणी शिबिरात निवडलेल्या 52 बालकांवर होणार शस्रक्रिया

हृदय तपासणी शिबिरात निवडलेल्या 52 बालकांवर होणार शस्रक्रिया

मोफत उपचार केले जाणार

गडचिरोली : येथे दोन दिवसांपूर्वी पार पडलेल्या मोफत 2डी इको व हृदय शस्त्रक्रिया तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात एकूण 314 बालकांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 210 रुग्णांची 2 डी इको तपासणी करण्यात आली. त्यात 62 रुग्णांमध्ये हृदयविकाराशी संबंधित समस्या आढळून आल्या. त्यापैकी 52 रुग्णांवर हृदय शस्त्रक्रिया आवश्यक असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांनी स्पष्ट केले, तर 10 रुग्णांची पुढील सखोल तपासणी करून उपचाराबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.

या आरोग्य शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्ह्याचे सहपालकमंत्री आशिष जयस्वाल, तसेच आरोग्यदूत फाऊंडेशनचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे यांनी प्रभावी नियोजन केले होते. या उपक्रमामुळे अनेक गरजू रुग्णांना वेळेत निदान, तज्ज्ञांचा सल्ला आणि आवश्यक उपचारांची संधी उपलब्ध झाली. गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांनी या शिबिराबद्दल समाधान व्यक्त केले आहे.