Home दैनंदिन बातम्या टायगर ग्रुपच्या गणेशोत्सवात आत्राम दाम्पत्याच्या हस्ते पुजा व महाप्रसाद

टायगर ग्रुपच्या गणेशोत्सवात आत्राम दाम्पत्याच्या हस्ते पुजा व महाप्रसाद

आलापल्लीत किल्ल्याच्या देखाव्याचे आकर्षण

अहेरी : आलापल्ली येथील विविध मंडळांकडून आयोजित गणेशोत्सव परिसरातील नागरिकांसाठी आकर्षण ठरला आहे. टायगर ग्रुपच्या वतीने आयोजित श्री गणेश उत्सवात यावर्षी केलेला किल्ल्याचा देखावा आकर्षणाचे केंद्र झाला आहे. या ठिकाणी अहेरी पंचायत समितीचे माजी सदस्य तथा युवा नेते हर्षवर्धनबाबा आत्राम व डॉ.मिताली आत्राम यांच्या हस्ते भक्तिमय वातावरणात गणरायाची पुजा व आरती करून महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. लहान्यांपासून ज्येष्ठांपर्यंत भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

गणेशोत्सवानिमित्त टायगर ग्रुपच्या वतीने गणेश मंडपाची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. किल्ल्याच्या भव्य प्रतिकृतीसह भगवे ध्वज आणि आकर्षक विद्युत रोषणाईने मंडप परिसराचे आकर्षण वाढले आहे. देखावा पाहण्यासाठी आणि गणरायाच्या दर्शनासाठी नागरिकांची गर्दी होत आहे.

गणेशोत्सवानिमित्त मियाम चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित ‘आदिवासी रूट्स अँड रेसिपीज’ या प्रदर्शनाच्या स्टॉललाही हर्षवर्धनबाबा आत्राम व डॉ.मिताली आत्राम यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी विविध खाद्यपदार्थांची पाहणी करून प्रदर्शनाची माहिती जाणून घेतली.

यावेळी अहेरी विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येरावार, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नागेश मडावी, सुरेंद्र अलोणे, कैलास कोरेत, बालाजी गावडे, सोमेश्वर रामटेके, सलीम शेख, आफ्रिदी सैय्यद यांच्यासह टायगर ग्रुपचे पदाधिकारी, कार्यकर्ते व गणेशभक्त उपस्थित होते.