
चामोर्शी : येथे आयोजित तान्हा पोळा उत्सवानिमित्त नगरपंचायतसमोरील आठवडी बाजारात भव्य तान्हा पोळा स्पर्धा आयोजित करण्यात आली होते. कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार डॉ मिलिंद नरोटे यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार अशोक नेते होते. (खाली वाचा)

यावेळी चिमुकल्यांच्या आनंदात सहभागी होत बालगोपालांनी सजविलेल्या नंदीबैलांचे पाहुण्यांनी कौतुक केले. चिमुकल्यांशी संवाद साधत त्यांना आमदार मिलिंद नरोटे व माजी खासदार अशोक नेते यांनी भेटवस्तू दिल्या. याशिवाय अशोक नेते यांनी व सर्व सहभागी स्पर्धकांना रोख बक्षीसेही दिली.
गेल्या पाच वर्षांपासून चामोर्शी येथे तान्हा पोळ्याच्या माध्यमातून संस्कृती, परंपरा आणि सामाजिक संदेश देणारा हा सुंदर उपक्रम तान्हा पोळा आयोजक मंडळाच्या वतीने राबविला जात आहे. बळीराजाचा जिवाभावाचा साथीदार असलेल्या बैलांविषयीची कृतज्ञता आणि आपली संस्कृती-परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न यातून केला जातो. आपल्या चिमुकल्यांचे भविष्य निरोगी, आनंदी आणि सुरक्षित असावे यासाठी नशेपासून दूर राहणे आणि आपल्या समाजालाही नशामुक्त बनविण्यासाठी प्रयत्न करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नशामुक्त महाराष्ट्राच्या संकल्पनेला साथ देत आपण सर्वांनी मिळून यासाठी पुढाकार घेऊया. आजचे बालगोपाल हे उद्याचे भविष्य आहेत व त्यांना संस्कारित करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे, असे प्रतिपादन माजी खासदार अशोक नेते व आमदार मिलिंद नरोटे यांनी केले.
यावेळी शहरातील सामाजिक कार्यकर्ते माजी न्यायमूर्ती सुनील दीक्षित, माणिक तुरे, शिक्षक दुबे, उद्योजक तपण दोषी, डॉ.तामदेव दूधबळे, रवी वाकूडकर यांना चामोर्शी रत्न पुरस्काराने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. संघ कार्यवाह किशोर ओल्लालवार, हिराराजी बनपूरकर, पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे, अविनाश तालापल्लीवार, यशवंत त्रिकांडे , रितेश पालरपवार, भाजपा तालुकाध्यक्ष तथा न.प. सभापती रोशनी वरघंटे, भाजयुमोचे उपाध्यक्ष निरज रामानुजनवार यांच्यासह भाजपा पदाधिकारी नरेश अलसावार, तुषार दुधबावरे, प्रकाश शिवनिवार, कार्यक्रमाचे आयोजक -सामाजिक कार्यकर्ते अमोल आईंचवार, नगरसेविका प्रेमा आईचंवार, राहुल पालरपवार, पंकज पेशट्टीवार, स्वयंम पिल्लीवार, परीक्षक वगरकर आणि शिक्षक चमू आणि नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन व सर्व व्यवस्थापन राष्ट्रीय मानवाधिकार संघटनचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, नम्रता राजकोंडावार यांनी केले.
































