Home राजकीय घडामोडी रिपब्लिकन पार्टी जिल्ह्यातील गावोगावी पोहचविण्याचा प्रयत्न

रिपब्लिकन पार्टी जिल्ह्यातील गावोगावी पोहचविण्याचा प्रयत्न

मेळाव्यात प्रा.बोरकर यांचा मनोदय

गडचिरोली : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या खुल्या पत्रावर आधारित रिपब्लिकन पार्टी असून डॉ.आंबेडकरांनी सांगितलेल्या तीन संघटनांपैकी आरपीआय एकमेव पार्टी आहे. ती गडचिरोली जिल्ह्यातील प्रत्येक गावागावात पोहोचविण्याचा माझा प्रयत्न राहील, असा मनोदय रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे (गवई) जिल्हाध्यक्ष प्रा.मुनिश्वर बोरकर यांनी कार्यकर्ता मेळाव्यात व्यक्त केला. चिमुर लोकसभा निर्वाचन क्षेत्रातून आलेल्या रिपब्लिकन पार्टीच्या असंख्य कार्यकर्त्यांना ते मार्गदर्शन करत होते.

रिपब्लिकन पार्टीचा जिल्हास्तरीय मेळावा यमुना हॉल गडचिरोली येथे रिपाइंचे प्रदेशाध्यक्ष प्रकाश कुंभे यांच्या अध्यक्षतेखाली झाला. माजी जि.प.सदस्य अॅड.राम मेश्राम यांच्या हस्ते उद्‌घाटन पार पडले. विशेष अतिथी म्हणून गायक, कलावंत डॉ.अनिरुद्ध वनकर, तर मुख्य अतिथी म्हणून पक्षाचे प्रदेश सरचिटणीस गोपाल रायपुरे, महिला आघाडी प्रमुख अँड.प्रियंका चव्हाण (चंद्रपूर), सामाजिक कार्यकर्ता प्रज्ञा निमगडे (आरमोरी) माहिती अधिकार अध्यक्ष तुळसिराम जांभुळकर, ॲड.विनय बांबोळे, साहित्यिक डॉ.चंद्रशेखर बांबोळे, प्रदेश उपाध्यक्ष बाजीराव उंदिरवाडे, प्राचार्य हेमंत रामटेके, बामसेफचे भोजराज कान्हेकर, प्रदेश सरचिटणीस सिद्धार्थ सुमन (भद्रावती) तर प्रमुख पाहुणे म्हणून रिपाइंचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष मोरेश्वर चंदनखेडे, डॉ.चंद्रसुरेश डोंगरवार, राज्य सचिव अशोक उमरे (कोरपना), कोमल रामटेके (चंद्रपूर) इंजि.विजय मेश्राम, सामाजिक कार्यकर्ता सुशिला भगत (आलापल्ली), घोट सर्कलचे अध्यक्ष विशाल दहिवले, समता सैनिक दलाचे प्रमुख अभिमन्यु बन्सोड, पत्रकार दिनेश झाडे, दिनेश वनकर, मनमन मंडल, दिक्षाभुमी वडसाच्या अध्यक्ष ममता जांभुळकर, अॅड.शांताराम उंदिरवाडे, जयंत शेंन्डे, किशोर उंदिरवाडे, राजकुमार रामटेके, निशांत भसारक, प्रमोद राऊत, रोहित पेगमपल्लीवार, दशरथ साखरे, मारोती भैसारे, मिलिंद अंबादे, ढेंभुर्णे सावकार, महिला प्रमुख संघमित्रा उंदिरवाडे, पिक्की शेंन्डे, विशाखा देवतळे, विलासिनी राऊत आदी मंचकावर विराजमान होते.

याप्रसंगी बहुसंख्य वक्त्याची भाषणे झाली. प्रा.मुनिश्वर बोरकर यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून अनेक चाहत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी विशेष अतिथी गायक डॉ.अनिरुद्ध वनकर यांनी रिपब्लिकन पार्टी ही रा.सु. गवईंच्या काळात जबरदस्त होती, आजही रिपाइं सर्वत्र आहे कारण रिपाइं ही भाजपा-शिवसेनेसोबत नसून कांग्रेसचा मित्र पक्ष म्हणून आहे. अध्यक्ष पदावरून प्रदेश अध्यक्ष प्रकाश कुंभे यांनी रिपब्लिकन पार्टीचा खरा शत्रू रिपब्लिकन पार्टीच्या गटातटातील छोटे-मोठे नेतेच आहेत. रिपब्लिकन पार्टीला वाढविण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.

सदर कार्यकर्ता मेळाव्यास गडचिरोली प्रमुख ज्ञानेश्वर मुजुमकर, जीवन मेश्राम, रोशन उके, मोरेश्वर उंदिरवाडे, लता रामटेके, लता भैसारे, चामोर्शी प्रमुख बंडू कुळवे, ॲड.डी.एन. राऊत, अॅड.एम.डी. सहारे, शालु खोब्रागडे, वर्षा सहारे, आरमोरी तालुका प्रमुख अशोक शामकुळे, ॲड.शुकदेवे, वडसा प्रमुख साजन मेश्राम, प्रभा मेश्राम, कुरखेडा प्रमुख सुनील सहारे, तारांचद नंदेश्वर, लता सहारे, धानोरा प्रमुख ढवळे, जर्नाधन बांबोळे, सिरोंचा तालुका प्रमुख शंकर अण्णा सेनिगारपु, अंकुल कलकोटा, समता सैनिक दलाचे मुत्ताजी दुर्गे, देवाजी भैसारे, निशा सिंपोडकर, यशोधरा मेश्राम, रेखा गणवीर, वालदे मॅडम कोंढाळा यांच्यासह चिमुर लोकसभा क्षेत्रातील रिपाइं व समता सैनिक दलाचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन गायक विजय शेंन्डे तर आभार निशांत भासारकर यांनी मानले.