गडचिरोली : जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जमीन अधिग्रहणाचा मुद्दा, शेतमालाला योग्य भाव, खतांचा प्रश्न, सिंचन, रस्ते, रोजगार, आरोग्य, महिलांच्या सुरक्षिततेसह जिल्ह्यातील अनेक मूलभूत प्रश्न आजही प्रलंबित आहेत. या प्रश्नांची शासनाने गांभीर्याने दखल घेऊन तातडीने निराकरण करावे, यासाठी शेतकरी संघर्ष कृती समितीच्या वतीने येत्या 7 सप्टेंबर रोजी श्री क्षेत्र मार्कंडादेव येथे महाअभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती समितीच्या वतीने देण्यात आली. (खाली वाचा)

विदर्भाची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र मार्कंडादेव येथे श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी, दि.7 सप्टेंबर रोजी श्री मार्कंडेश्वर महादेवाचा महाअभिषेक करण्यात येणार आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकरी, युवक, महिला आणि नागरिकांच्या विविध समस्या मार्गी लागाव्यात, शेतकऱ्यांना न्याय मिळावा आणि गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाला गती मिळावी, यासाठी प्रार्थना करण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी आणि जिल्ह्यातील हक्काच्या प्रश्नांवर एकजुटीने उभे राहण्यासाठी मोठ्या संख्येने शेतकरी, महिला-युवक व नागरिकांनी उपस्थित राहून या महाअभिषेक सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन शेतकरी नेते महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केले आहे.
या बैठकीला काँग्रेसचे चामोर्शी तालुकाध्यक्ष प्रमोद भगत, जिल्हा उपाध्यक्ष नेताजी गावपुरे, जिल्हा उपाध्यक्ष अनिल कोठारे, दिवाकर निसार, तात्याजी चिचघरे, ढिवरू मेश्राम, नदिम नाथानी, विजय लाड, अमर मोगरे, नरेंद्र कोठारे, संजय बुरांडे, गुरुदास भुर्से, दीपक दुमणे, मुखरू शेंडे, वसंत बुरमवार, विलास भोयर, पांडुरंग दरडे, मनोहर शेंडे, गंगाधर बोमनवार, सचिन निर्मलवार, नीलकंठ हजारे, संतोष पाल, गौरव येणप्रेड्डीवार, साहिल वडेट्टीवार, प्रफुल बरसागडे, तेजस कोंडेकर, कालिदास पेंदाम, गुरुदास ठाकरे,रोहिदास मेश्राम, सुनील कोहपरे, मारुती चौधरी, जानकीराम पोरेटे, अनिल कुमरे, तुकाराम गांधरवार, तोताजी जेंगठे, भक्तदास भगत, शामराव खोब्रागडे, मुखरू शेंडे, नेहल आभारे, विपुल एलटिवार यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
































