Home क्राईम दोन मोठ्या ट्रकमधून सुरू होती 88 गोवंशीय जनावरांची तस्करी

दोन मोठ्या ट्रकमधून सुरू होती 88 गोवंशीय जनावरांची तस्करी

38 लाखांचा मुद्देमाल केला जप्त

एटापल्ली : धानोरा तालुक्यातून होत असलेली गोवंशीय जनावरांची कत्तलखान्यातील तस्करी रोखल्यानंतर बुधवारी (दि.26) एटापल्ली पोलिसांनी अवैधरित्या गोवंशीय जनावरांची वाहतूक करणारे दोन मोठे ट्र्क पकडून 88 जनावरांचे जीव वाचवले. (खाली वाचा)

सविस्तर वृत्त असे आहे की, मंगळवारी रात्री एटापल्ली पोलीस स्टेशनचे पथक रात्री गस्त करीत असताना गोपनिय माहितीवरून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आलेंगाटोला येथील कसनसूर-आलापल्ली रोडवर सापळा रचुन पाळत ठेवण्यात आली. (खाली वाचा)

दिनांक 26 ऑगस्ट रोजी पहाटे एक ट्रक संशयितरित्या येताना दिसुन आला. त्यावेळेस पोलीस पथकाने रस्त्यावर तात्पुरता अडथळा निर्माण करुन वाहनास थांबविण्याचा प्रयत्न केला असता, वाहन चालकाने वाहन न थांबविता पळून जाण्याचा प्रयत्न केला.(खाली वाचा)

पोलीस पथकाने त्याचा पाठलाग केला असता, वाहन चालक मौजा गुरुपल्ली येथे वाहन सोडून जंगल परिसराचा फायदा घेत घटनास्थळावरुन पसार झाल्याचे दिसून आले. पोलीस पथकाने वाहनाची पाहणी केली असता, वाहनामध्ये अवैधरित्या विनापरवाना कत्तलीसाठी घेऊन जाणारे गोवंशीय जनावरे अतिशय निर्दयतेने कोंबुन भरले असल्याचे निदर्शनास आले. (खाली वाचा)

यादरम्यान एक अन्य ट्रक देखिल त्याच मार्गाने अवैधरित्या गोवंशीय जनावरांची वाहतूक करणार असल्याबाबत पोलीस पथकास माहिती मिळाली. त्यामुळे पुन्हा तात्पुरता अडथळा निर्माण केला. मात्र चालकास पोलिसांनी रस्ता अडविल्याचे दिसून आल्याने ट्रक थांबवून चालकाने जंगलाचा फायदा घेऊन पळून काढला. (खाली वाचा)

यानंतर पोलीस पथकाने पंचांसमक्ष सदर दोन्ही वाहनांची तपासणी केली असता, ट्रक क्रमांक टीएस 08, युबी 5779 यामध्ये 40 गोवंशीय जनावरे (किंमत 6,00,000 रुपये), त्याचप्रमाणे ट्रक क्रमांक एपी 16 टीई 1238 ज्यामध्ये 48 गोवंशीय जनावरे (किंमत 7,20,000 रुपये) होती. दोन्ही बारा चाकी ट्रकची अंदाजे किंमत 25,00,000 रुपये असा एकूण 38,20,000 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. (खाली वाचा)

अज्ञात आरोपी वाहन चालक व मालक यांच्याविरुद्ध एटापल्ली पोलिसांनी प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियमासह इतर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे . सदर गुन्ह्रातील अज्ञात वाहन चालक व मालक यांचा शोध सुरू आहे. (खाली वाचा)

गुन्ह्याचा अधिक तपास पोनि.मच्छींद्र नागरगोजे करीत आहेत. गेल्या आठवडाभरामध्ये पोस्टे कोटगुल, कुरखेडा व एटापल्ली हद्दीत अवैध गोवंशीय जनावरांच्या वाहतुकी विरोधात 4 मोठ्या कारवाया करण्यात आल्या आहेत. त्यामाध्यमातून एकूण 145 गोवंशीय जनावरांची सुटका करण्यात आली. (खाली वाचा)

ही कारवाई पोलीस अधीक्षक एम.रमेश यांच्या आदेशान्वये अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) हर्षवर्धन बी.जे., उपविभागीय पोलीस अधिकारी (एटापल्ली) संतोष बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि.मच्छींद्र नागरगोजे यांच्या नेतृत्वात पोउपनि.किशोर पायघन, हवालदार गंगाधर वट्टी, अंमलदार भुपेंद्र कारीहरताल, चंद्रशेखर शेकुर्तीवार, शामु मडावी, जयराम पुंगाटी, रोशन पुराम, मोहन शिंदे, प्रविण वैरागडे यांनी पार पाडली.