Home दैनंदिन बातम्या गडचिरोलीत दाखल नवीन बसेस लोकार्पणानंतर प्रवासी सेवेत रूजू

गडचिरोलीत दाखल नवीन बसेस लोकार्पणानंतर प्रवासी सेवेत रूजू

प्रादेशिक व्यवस्थापकांची उपस्थिती

गडचिरोली : जिल्ह्यातील एसटी प्रवाशांच्या सेवेत दाखल झालेल्या दुसऱ्या टप्प्यातील नवीन 20 जिजाऊ बसेसचा रितसर लोकार्पण व उद्घाटन सोहळा शुक्रवारी (दि.25) गडचिरोली बस स्थानक परिसरात झाला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून नागपूरच्या सनियंत्रण समितीचे प्रादेशिक व्यवस्थापक श्रीकांत गभणे आणि गडचिरोली विभागाचे विभाग नियंत्रक चंद्रकांत वडस्कर उपस्थित होते.

अतिथी म्हणून उपस्थित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नवीन वाहनांची विधीवत पुजा केली. त्यानंतर नवीन बसेसला हिरवी झेंडी दाखवून त्या प्रवाशांच्या सेवेसाठी मार्गस्थ केल्या. यावेळी गडचिरोलीचे आगार प्रमुख सचिन नेवारे, वाहतूक निरीक्षक पवन बासनवार आणि पुजा वासनिक यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते.

या सोहळ्यासाठी निशिकांत उईके, अशोक सुत्रपवार, रामचंद्र सायलवार, पल्लवी वडेट्टीवार, निलिमा बोकडे, अशोक नैताम यांनी विशेष परिश्रम घेतले. या नवीन बसेसमुळे प्रवाशांना अधिक सुखकर, सुरक्षित आणि आरामदायी प्रवास लाभणार आहे.