दुर्गम भागातील युवक-युवती ऑस्ट्रेलियात घेणार मायनिंग इंजिनिअरिंगचे धडे

इंग्लिश स्पीकिंग कोर्ससाठी नागपूरला रवाना

गडचिरोली : लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड सुरजागड आयर्न ओर माईन्स आणि लॉयड्स इन्फिनिट फाऊंडेशनच्या वतीने गडचिरोलीच्या दुर्गम भागातील १५ विद्यार्थ्यांना ऑस्ट्रेलियात माइनिंग इंजिनिअरिंगच्या शिक्षणाकरिता पाठविण्यात येणार आहे. तत्पूर्वी त्यांना इंग्लिश स्पिकिंग कोर्ससाठी नागपूरला रवाना करण्यात आले. हे सर्व युवक-युवती एटापल्ली तालुक्यातील आहेत.

माइनिंग इंजिनिअरिंगचे शिक्षण घेण्यासाठी निवड झालेल्या १५ विद्यार्थ्यांना इंग्रजी सुरळीत बोलता यावे यासाठी नागपूर येथे इंग्रजी स्पिकींग कोर्सचे शिक्षण घेण्याकरिता पाठविण्यात आले आहे. त्यांचे नागपुरातील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढे त्यांना ॲडव्हान्स कोर्सकरिता दिल्लीला पाठविण्यात येणार आहे. दोन्ही कोर्सेस पुर्ण झाल्यानंतर त्यांना माइनिंग इंजिनिअरिंगचे शिक्षण घेण्याकरिता ऑस्ट्रेलियाला पाठविण्यात येणार आहे.

नागपूरला रवाना करताना विद्यार्थ्यांचे पालक व लॉयड्स मेटल्सचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शुभेच्छा देऊन विद्यार्थ्यांना एटापल्लीवरुन निरोप देण्यात आला.