गडचिरोली : भाजप-महायुतीचे उमेदवार डॉ.मिलिंद नरोटे यांच्या प्रचारासाठी जिल्हा उपाध्यक्ष प्रणय खुणे हे चामोर्शी तालुक्यातील बंगालीबहुल गावे पिंजून काढत आहेत. ठिकठिकाणी कॅार्नर सभांसह छोट्या रॅली काढून त्यांनी वातावरण भाजपमय केले आहे. आम्ही भाजपसोबतच राहणार आणि डॅा.मिलिंद नरोटे यांना निवडून आणणार, असा संकल्प विविध ठिकाणच्या नागरिकांनी व्यक्त केला.
या प्रचारात प्रणय खुणे यांच्यासोबत भाजपचे छत्तीसगड बंगाली आघाडी प्रभारी मनमथो मंडल, भाजपा महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष तथा नगरसेविका रोशनी वरघंटे, महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष शिल्पा राय, गडचिरोली विधानसभा बंगाली आघाडी प्रमुख रमेश अधिकारी, माजी सरपंच प्रतिमा सरकार, माजी पंचायत समिती सदस्य विष्णू ढाली, सरपंच हृदय बाला, माजी सरपंच असीम मुखर्जी, महिला आघाडी तालुकाध्यक्ष अनिता राय, प्रदीप मंडल, सुजित रॉय, बलराम बक्षी यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्तेही सहभागी झाले होते.