महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी घनश्याम मडावी यांची नियुक्ती

आदिवासी विकास परिषदेकडून सत्कार

गडचिरोली : अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे विदर्भ कार्याध्यक्ष आणि आदिवासी सेवक घनश्याम लहुजी मडावी यांची महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेश अध्यक्ष सुरेश चिंचोळकर यांनी त्यासंदर्भातील नियुक्तीपत्र जारी केले. त्यांच्या या नियुक्तीचे सर्वत्र स्वागत केले जात आहे.

दरम्यान या नियुक्तीबद्दल अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद शाखा गडचिरोलीच्या वतीने मडावी यांचा सत्कार करून त्यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव गेडाम, महासचिव गंगाधर मडावी, कोषाध्यक्ष रवींद्र उईके, सहसचिव सचिन मडावी, महिला आघाडीच्या अध्यक्ष वर्षा शेडमाके, विनोद मडावी, सुरज मडावी, विपीन मेश्राम तसेच मधुकर कन्नाके, जिल्हा सचिव निलेश कोडापे आदी उपस्थित होते.