दुर्गम गावांमधील नागरिकांनी आमदारांपुढे मांडल्या समस्या

अडचणी दूर करणार- डॅा.नरोटे

गडचिरोली : गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील पुसेर आणि देवापूर या दुर्गम गावांना आ.डॅा.मिलिंद नरोटे यांनी भेट देऊन ग्रामसभेच्या माध्यमातून तेथील समस्या जाणून घेतल्या. यावेळी गावकऱ्यांनी रस्ते, वीज, पाणी, आरोग्य सुविधा, शिक्षण, वनहक्क, शेती आणि रोजगार आदी विषयांवर चर्चा करून त्यांच्या समस्या सांगितल्या. त्या समस्या संबंधित विभागांपर्यंत पोहोचवून लवकर सोडविण्याचे आश्वासन डॅा.नरोटे यांनी दिले.

या भेटीत त्यांनी स्थानिक तरुणांनी मेहनतीने उभारलेल्या गावाजवळील फळबाग प्रकल्पाला भेट दिली. तसेच देवापूर गावातील कुर्माघर, गोटुल,सभागृह, तसेच नाल्यांशी संबंधित विविध समस्या जाणून घेतल्या. त्या सोडवण्यासाठी लवकरच आवश्यक पावले उचलण्याची ग्वाही दिली.

यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तथा मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॅा.प्रणय खुणे, मुरांडा ग्रामसभेचे इलाक्याचे अध्यक्ष केशरी पाटील उसेंडी, पावीमुरांडाच्या सरपंच ताई आतला, पुसेर ग्रामसभेचे अध्यक्ष नामदेव मठ्ठामी, देवपूर ग्रामसभेचे अध्यक्ष देवास पा.पोटावी व इतर गावकरी उपस्थित होते.